एक्स्प्लोर

शिवशाही बसच्या भीषण अपघातात 8 जण ठार, बातमी समजताच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्परतेने मदतीला धावले, मोठी घोषणा

Gondia : गोंदियात झालेल्या शिवशाही बस अपघाताची बातमी समजताच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची यांची मदत देण्याचे आदेश परिवहन प्रशासनाला दिले आहेत.

Gondia Shivshahi Bus Accident : गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ एक भीषण अपघात झाला आहे. यात नागपुरकडून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस उलटली आहे. या अपघातात 7-8 प्रवासी मृत्यू झाल्याची माहिती असून हे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर आणखी 5-7 मृतदेह आत असल्याची माहिती पुढे आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाकडून बचाव कार्य सुरु आहे. तर या भीषण अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

तर दुसरीकडे या अपघाताची बातमी समजताच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची यांची मदत देण्याचे आदेश परिवहन प्रशासनाला दिले आहे. तसेच स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती ही मुख्यमंत्र्यांनी घेतली असून जखमींना तातडीने आणि योग्य उपचार देण्याच्या सूचना ही दिल्या आहेत.   

देवेंद्र फडणवीसांकडून मृतांना श्रद्धांजली

गोंदियातील शिवशाही बसचा दुर्दैवी अपघाताची बातमी समजतात आता राजकीय वर्तुळातूनही हळहळ व्यक्त केली आहे. या अपघाताबद्दल आता देवेंद्र फडणवीस यांनीही शोक व्यक्त करत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनीनजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास त्यांना नागपूरला हलविण्याची व्यवस्था करा, असेही मी गोंदियाच्या जिल्हाधिकार्‍यांना सांगितले आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, ते मदतकार्यासाठी समन्वय करीत आहेत. या घटनेतील जखमींना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.  असे देवेंद्र फडणवीस यांनी एका पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

भरधाव कंटेनरने दुचाकीस्वाराला उडवलं

अशीच एक अपघाताची घटना आज नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गवरील किन्ही जवादे फाट्याजवळ घडली आहे. यात दुचाकी आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. देविदास लक्ष्मण उरकुडे आणि देविदास केशव मडावी अशी मृतांची नावे आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील वडकीपासून पाच किलोमिटर अंतरावरील किन्ही जवादे फाट्याजवळ एकेरी वाहतुकीमुळे या दोन निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. मात्र एकेरी वाहतुकीमुळे हा अपघात झाल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

एकेरी वाहतुकीमुळे दोन निष्पापांचा बळी  

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातील एचपी गॅसचे कंटेनर नागपूरकडून हैद्राबादकडे जात होते. यातच दुचाकी पाढरकंवडाकडून वडकीकडे येत होते. दरम्यान, या दोन्ही वाहनांची किन्ही जवादे फाट्याजवळ समोरासमोर धडक बसून अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Arya Encounter: रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
Video: तुम्हाला चिअर करण्यासाठी सचिन, रोहित आला, आमचे क्रिकेटर कुठं आहेत? दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री भडकली
Video: तुम्हाला चिअर करण्यासाठी सचिन, रोहित आला, आमचे क्रिकेटर कुठं आहेत? दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री भडकली
Canara Bank : कॅनरा बँकेचे गुंतवणूकदार मालमाल, बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, नफा वाढला
कॅनरा बँकेचे गुंतवणूकदार मालमाल, बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, नफा वाढला
भरधाव ट्रकने 17 वाहने चिरडली, 19 जणांच्या चिंधड्या; ट्रक डायव्हरचा रस्त्यावर रक्ताचा पाट, 300 मीटरपर्यंत वाहने ठोकली
भरधाव ट्रकने 17 वाहने चिरडली, 19 जणांच्या चिंधड्या; ट्रक डायव्हरचा रस्त्यावर रक्ताचा पाट, 300 मीटरपर्यंत वाहने ठोकली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Heavy Rains: 'सोयाबीननंतर आता कापूसही गेला', Hingoli तील शेतकरी हवालदिल, ओल्या कापसामुळे संकट
Nanded Road Scam: डांबरी रस्ता चक्क हातानं उचलला, Nanded मधील निकृष्ट कामाचा Video Viral
Farmer Distress: नाशिकमध्ये मिरची पाण्याखाली, शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
Fake Encounter : 'रोहित आर्यची हत्या झाली', वकील Nitin Satpute यांची पोलिसांच्या Narco Test ची मागणी
Lawyer Suspended: 'राज्यपाल फालतू आहेत', वादग्रस्त वक्तव्यामुळे Asim Sarode यांची सनद निलंबित

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Arya Encounter: रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
Video: तुम्हाला चिअर करण्यासाठी सचिन, रोहित आला, आमचे क्रिकेटर कुठं आहेत? दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री भडकली
Video: तुम्हाला चिअर करण्यासाठी सचिन, रोहित आला, आमचे क्रिकेटर कुठं आहेत? दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री भडकली
Canara Bank : कॅनरा बँकेचे गुंतवणूकदार मालमाल, बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, नफा वाढला
कॅनरा बँकेचे गुंतवणूकदार मालमाल, बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, नफा वाढला
भरधाव ट्रकने 17 वाहने चिरडली, 19 जणांच्या चिंधड्या; ट्रक डायव्हरचा रस्त्यावर रक्ताचा पाट, 300 मीटरपर्यंत वाहने ठोकली
भरधाव ट्रकने 17 वाहने चिरडली, 19 जणांच्या चिंधड्या; ट्रक डायव्हरचा रस्त्यावर रक्ताचा पाट, 300 मीटरपर्यंत वाहने ठोकली
Video: मराठी माझी आई, उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल मात्र मावशी मरता कामा नये; शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंची मुक्ताफळे
Video: मराठी माझी आई, उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल मात्र मावशी मरता कामा नये; शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंची मुक्ताफळे
घरखर्च देत नसल्याच्या रागातून पोटच्या पोरांनीच आईबापाचा काटा काढला, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले, रायगड हादरलं
घरखर्च देत नसल्याच्या रागातून पोटच्या पोरांनीच आईबापाचा काटा काढला, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले, रायगड हादरलं
Nashik Politics: दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, चारोस्करांनी कमळ हाती घेताच गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; नरहरी झिरवाळांना राजकीय शह?
दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, चारोस्करांनी कमळ हाती घेताच गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; नरहरी झिरवाळांना राजकीय शह?
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.46 पर्यंत राहण्याची शक्यता, पगार किती रुपयांनी वाढणार?
आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.46 पर्यंत राहण्याची शक्यता, पगार किती रुपयांनी वाढणार?
Embed widget