एक्स्प्लोर
Canara Bank : कॅनरा बँकेचे गुंतवणूकदार मालमाल, बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, नफा वाढला
Canara Bank : कॅनरा बँकेच्या शेअरमध्ये आज मोठी तेजी पाहायला मिळाली. बँकेच्या शेअरनं आज 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. बँकेचा स्टॉक 141.45 रुपयांवर पोहोचला आहे.
कॅनरा बँक
1/6

कॅनरा बँकेच्या शेअरमध्ये सोमवारी म्हणजेच 3 नोव्हेंबरला जोरदार तेजी पाहायला मिळाली. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या कॅनरा बँकेच्या शेअरमध्ये 1.97 तेजी पाहायला मिळाली.आज बाजार बंद झाला तेव्हा बँकेचा शेअर 139.69 रुपयांवर पोहोचला.
2/6

गेल्या तीन दिवसांचा विचार केला असता बँकेच्या शेअरमध्ये 10 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे. बाजार जाणकारांच्या मते दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानं तेजी आली असावी.दुसऱ्या तिमाहीच्या निकालानुसार बँकेचा निव्वळ नफा 4774 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत नफा 19 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी दुसऱ्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 4014 कोटी रुपये होता.
3/6

कॅनरा बँकेनं काही दिवसांपूर्वी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. बँकेचा निव्वळ नफा वाढत असल्याचं पाहायला मिळतं. कॅनरा बँकेचा निव्वळ नफा 4774 कोटी रुपये झाला आहे. मात्र, बँकेला व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. जे 9141 कोटी रुपयांवर आलं आहे.
4/6

कॅनरा बँकेचं कर्ज, ठेवी आणि दुसऱ्या सेवांच्या बाबत प्रदर्शन चांगलं दिसून आलं आहे. बँकेचा जागतिक व्यवसाय वाढत आहे. जो 26.79 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जागतिक ठेवी 15.28 लाख कोटींवर पोहोचल्या आहेत.
5/6

कर्ज वसुलीच्या बाबतीत बँकेनं चांगली कामगिरी केली आहे. बँकेचा ग्रॉस एनपीए 138 बेसिस पॉईंटनं कमी होऊन 2.35 टक्के राहिला आहे.
6/6

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 03 Nov 2025 07:26 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
























