एक्स्प्लोर
Heavy Rains: 'सोयाबीननंतर आता कापूसही गेला', Hingoli तील शेतकरी हवालदिल, ओल्या कापसामुळे संकट
हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे कापूस (Cotton) आणि सोयाबीन (Soybean) पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. 'सोयाबीन पाठोपाठ शेतकऱ्यांच्या हातातून आता कापसाचं पीक सुद्धा निघून जाण्याचा धोका आहे,' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सुमारे ३४ हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली होती, मात्र सततच्या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे भिजला आहे. कापसाची बोंडं पाण्यामुळे सडून जात असून, कापूस काळा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे बाजारात चांगला भाव मिळणार नाही अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. सोयाबीनच्या नुकसानीनंतर कापसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, पिकासाठी केलेला खर्चही निघणार की नाही, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
महाराष्ट्र
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























