Baba Siddique Case: बाबा सिद्दीकी प्रकरणाच्या चौकशीदरम्यान पहिल्यांदा लॉरेन्स बिश्नोईचे नाव समोर; गोळ्या झाडणाऱ्या आरोपीचा खुलासा
Baba Siddique Case: मुख्य शूटर शिवकुमार गौतम याने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, पुण्यात खुनाच्या तयारीत असताना त्याने तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी बोलणं झालं होतं.
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान मोठा खुलासा समोर आला आहे. चौकशीवेळी पहिल्यांदाच एका आरोपीने कबूल केले आहे की, बाबा सिद्दीकी (Baba Siddique)यांच्या हत्येचा कट रचला जात असताना गुजरात तुरुंगातील कैदी लॉरेन्स बिश्नोई याच्याशी बोलणं झालं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात नुकताच अटक करण्यात आलेला मुख्य शूटर शिवकुमार गौतम याने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, पुण्यात खुनाच्या तयारीत असताना त्याने तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी (Lawrence Bishnoi) बोलणं झालं होतं. (Baba Siddique Case)
या चर्चेदरम्यान बिष्णोई (Lawrence Bishnoi) यानी सिद्दिकीच्या हत्येनंतर पोलिसांनी त्याला पकडले तर घाबरू नका असं देखील सांगितलं होतं, त्याचबरोबर आश्वासन दिलं होतं. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने (Lawrence Bishnoi) त्यांना वचन दिलं होतं की, तो आणि त्याची टीम काही दिवसात गौतमला तुरुंगातून बाहेर काढतील. याशिवाय, लॉरेन्स बिश्नोईने (Lawrence Bishnoi) हत्येसाठी शूटरला 12 लाख रुपये देण्याचे आणि जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याला परदेशात पाठवण्याचे आश्वासन देखील दिले होते.
शिवकुमार गौतम याने पोलिसांना चौकशीवेळी सांगितले की, लॉरेन्सने सांगितले होते त्याच्याकडे वकिलांची एक टीम आहे. जी गौतमला अटक झाल्यास काही दिवसांत त्याची सुटका करण्याची व्यवस्था करू शकेल. बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येशी संबंधित प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचे (Lawrence Bishnoi) नाव येण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधीही अनेकदा या हत्येशी संबंधित तपासादरम्यान लॉरेन्स बिश्नोईचा (Lawrence Bishnoi) भाऊ अनमोल बिश्नोईचे (Anmol Bishnoi) नाव समोर आले आहे.
गेल्या महिन्यात दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची शिवकुमार गौतमने गोळ्या झाडून हत्या केली होती. एका महिन्यानंतर नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक करण्यात आली. या घटनेत सहभागी असलेले अन्य दोन आरोपी हरियाणातील गुरनैल सिंग आणि उत्तर प्रदेशातील धर्मराज कश्यप यांना हत्येनंतर लगेचच अटक करण्यात आली.
त्यानंतर आता शिवकुमार गौतमने चौकशीत मोठा खुलासा केला आहे. त्याने लॉरेन्स बिश्नोई टोळीने त्याला फसवून खून केला. फरार आरोपी शुभम लोणकर याने गौतमला गँगस्टर दहशतवादी दाऊद इब्राहिमचे फोटो दाखवले आणि त्याला सांगितले की बाबा सिद्दिकीचे दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत आणि गुंड भारताचा शत्रू आहे.