भरधाव ट्रकने 17 वाहने चिरडली, 19 जणांच्या चिंधड्या; ट्रक डायव्हरचा रस्त्यावर रक्ताचा पाट, 300 मीटरपर्यंत वाहने ठोकली
Jaipur Truck Accident: पोलिसांचे म्हणणे आहे की अपघातापूर्वी सुमारे दीड किलोमीटर अंतरावर पेट्रोल पंपाबाहेर डंपर चालकाचा कार चालकाशी वाद झाला होता.

Jaipur Truck Accident: जयपूरमध्ये एका भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर ट्रकने एकामागून एक 17 वाहनांना दिलेल्या भीषण धडकेत 19 जणांचा चिंधड्या झाल्या. मृत्यू झालेल्यांपैकी अनेकांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न झाले आहेत. सहा गंभीर जखमींना एसएमएस हॉस्पिटल ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, हा अपघात आज (3 नोव्हेंबर) दुपारी हरमडा येथील लोहा मंडी येथे घडला. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास, डंपर महामार्गावर जाण्यासाठी रोड क्रमांक 14 वरून लोहा मंडी पेट्रोल पंपाकडे जात होता. यादरम्यान, तो वाहनांना धडक देत सुटला. घटनास्थळी लोकांनी डंपर चालकाला पकडले. तो मद्यधुंद होता. चालक कल्याण मीणा हा विराटनगरचा रहिवासी आहे आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की अपघातापूर्वी सुमारे दीड किलोमीटर अंतरावर पेट्रोल पंपाबाहेर डंपर चालकाचा कार चालकाशी वाद झाला होता.
300 मीटरपर्यंत वाहने चिरडत नेली (Dumper hits 17 vehicles Jaipur)
हेड कॉन्स्टेबल रवींद्र म्हणाले की, डंपर रिकामा होता. ते रोड क्रमांक 14 कडे जात होते. लोहा मंडी रोडवर सुमारे 300 मीटर अंतरापर्यंत वाहने चिरडत नेली. लोकांना रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर पेट्रोल पंपाबाहेर डंपर चालकाचा कार चालकाशी वाद झाला. त्यानंतर, मद्यधुंद चालक डंपर घेऊन पळून गेला. चुकीच्या बाजूने गाडी चालवत असताना त्याने एका दुचाकीला धडक दिली. दुचाकीला धडक दिल्यानंतर नागरिकांनी पाठलाग सुरू केला. चालकाने डंपर वेगाने चालवत राहिला. अपघातानंतरही जयपूरच्या लोहा मंडी रोडवर ओव्हरलोड माल वाहून नेणारे ट्रेलर दिसले. अपघातानंतर संतप्त लोकांनी असाच एक ट्रेलर थांबवला.
डंपर 100 किमीपेक्षा जास्त वेगाने चालवत होता (Drunk Truck Driver Jaipur)
पोलिसांचे म्हणणे आहे की अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे, ज्यामध्ये डंपर चालक 100 किमीपेक्षाही जास्त वेगानेचालवत असल्याचे, वाहनांना धडक देत लोकांना चिरडताना दिसत आहे. घटनास्थळी उपस्थित असलेले राकेश कुमार जांगिड आणि रामदयाल मीणा यांनी सांगितले की, अपघात त्यांच्या समोरच घडला. रस्त्याच्या चुकीच्या बाजूने येणाऱ्या डंपरने प्रथम चौकात एका दुचाकीला चिरडले आणि नंतर स्विफ्ट कारसह तीन वाहनांना चिरडले. डंपर इतक्या वेगाने जात होता की रस्त्यात दिसेल त्याला चिरडत गेला.
इतर महत्वाच्या बातम्या
























