एक्स्प्लोर

Gautami Patil : गौतमी म्हणतेय 'रात्रभर जागली विचारात तुमच्या'; गौतमी पाटीलच्या आगामी सिनेमातील 'मी करते तुम्हाला मुजरा' लावणी प्रेक्षकांच्या भेटीला

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या आगामी सिनेमातील 'मी करते तुम्हाला मुजरा' ही लावणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Gautami Patil : 'लावणी क्वीन' गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या चर्चेत आहे. आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ केल्यानंतर रुपेरी पडदा गाजवायला गौतमी सज्ज झाली आहे. गौतमीचा 'घुंगरु' (Ghungroo) हा आगामी सिनेमा असून या सिनेमातील पहिली लावणी आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'मी करते तुम्हाला मुजरा' (Me Karte Tumhala Mujra) असे या लावणीचे नाव आहे. 

गौतमीच्या 'मी करते तुम्हाला मुजरा'ने वेधलं चाहत्यांचं लक्ष 

गौतमीची 'मी करते तुम्हाला मुजरा' ही लावणी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. पण काही मंडळींकडून या लावणीवर आक्षेप घेतला जात आहे. आक्षेपार्ह डान्स स्टेप्स केल्यामुळे गौतमी गेल्या काही दिवसांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आता 'मी करते तुम्हाला मुजरा' या लावणीमुळे गौतमी चर्चेत आहे. 'रात्रभर जागली विचारात तुमच्या.. अहो पाव्हणं या बसा', 'करुन साज नटले आज, अहो श्रृंगार केलाय असा, मी करते तुम्हाला मुजरा', 'या बसा तुम्ही सोबतीला राखते मर्जी, चंद्रावाणी रुप माझं नजर लावू नका', असे या लावणीचे बोल आहेत. 

गौतमीच्या अदांनी चाहते घायाळ

'मी करते तुम्हाला मुजरा' या लावणीतील ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल आणि गौतमीच्या दिलखेचक अदांनी चाहते घायाळ झाले आहेत. साजशृंगार आणि सौंदर्याची नजाकत पाहण्याजोगी आहे. या गाण्यातील गौतमीचा लुक खूपच लक्षवेधी आहे. पांढऱ्या रंगाची नऊवारी साडी, त्याला लाल रंगाची जरीची काठ, साज, केसात गजरा, नथा असा काहीसा गौतमीचा लुक आहे. पण यात लक्ष वेधून घेतो तो ब्लाऊज. या गाण्यात गौतमीने घातलेल्या ब्लाऊजवर 'सबसे कातील गौतमी पाटील' असे लिहिलेले आहे. 

'मी करते तुम्हाला मुजरा' लावणीबद्दल जाणून घ्या...

'मी करते तुम्हाला मुजरा' ही लावणी साईनाथ पाटोळे आणि मारुती सोनू यांनी लिहिली आहे. वैष्णवी आदोडेने ही लावणी गायली आहे. तर महेंद्र बनसोडेने गौतमीची लावणी कोरिओग्राफ केली आहे. सिनेमातील या लावणीत तमाशाचा फड दाखवण्यात आला आहे. यात गौतमी पाटील लावणी सादर करत असून अनिल नगरकर, ऋषिकेश मोरे, साईनाथ  जवळकर, अमर गजघाटे, राजाभाऊ कदम ही मंडळी या लावणीचा आनंद घेताना दिसत आहेत. 

गौतमीच्या या लावणीवर 'गौतमी पाटीलचा नाद खुळा', 'सबसे कातील गौतमी पाटील', 'नाद फक्त गौतमीचा', 'इथ तिथं नाय, थेट काळजावर घाव' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर ही लावणी व्हायरल होत आहे. लावणी पाहिल्यानंतर चाहते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 

गौतमीचा 'घुंगरु' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

गौतमी पाटीलचा 'घुंगरु' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं शूटिंग सोलापूर, मढ, हंपीसह परदेशातदेखील झालं आहे. या सिनेमात गौतमी बाबा गायकवाडसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे असे म्हटले जात आहे. या सिनेमाचं कथानक कलावंत आणि लोककलावंत यांच्या आयुष्यावर भाष्य करणारं आहे. 

संबंधित बातम्या

'लावणी क्वीन' गौतमी पाटील रुपेरी पडद्यावर झळकणार; परदेशात झालय सिनेमाचं शूटिंग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान,  5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
लालबागचा राजाच्या चरणी 5 कोटी 65 लाख रोख रुपयांचं दान, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?',  विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?', विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Truck Accident पुण्यात ट्रक खड्ड्यात व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, पुणे समाधान चौकात नेमकं काय घडलं ?TOP 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : ABP MajhaRatnagiri : स्वप्नात डेडबॉडी पाहणारा 'तो' तरूण कुठे आहे? घटनेचा ऑनलाईन गेमशी संबंध? Special ReportSpecial Report Tirupati Balaji Prasad : तिरुपतीचा प्रसाद, राजकीय वाद; प्रसादात प्राण्यांची चरबी आली कुठून?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान,  5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
लालबागचा राजाच्या चरणी 5 कोटी 65 लाख रोख रुपयांचं दान, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?',  विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?', विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
VIDEO : लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Shadashtak Yog : सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींना नोकरी-व्यवसायात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींच्या जीवनात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
Embed widget