Gadchiroli Police : नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ला राहिलेल्या परिसरात पोलिसांनी नाकावर टिच्चून उभारले मदत केंद्र
Gadchiroli Police : नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ला राहिलेल्या परिसरात पोलिसांनी एन्ट्री केली अन् त्याठिकाणी मदत केंद्र देखील उभारले आहे.
Gadchiroli Police : गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli Police) अतिदुर्गम भागातील आजवर नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला राहिलेल्या परिसरात त्यांच्या नाकावर टिच्चून पोलिसांनी अवघ्या एका दिवसात पोलीस मदत केंद्र उभारण्याची किमया केली आहे... पेनगुंडा गावाजवळ पोलीस मदत केंद्र उभारण्याच्या या मोहिमेत पोलीस (Gadchiroli Police) अधीक्षक, इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह गडचिरोली पोलीसातील शेकडो जवान सहभागी झाले होते...
अनेक गावांवर नक्षलवाद्यांची बिनधास्त हुकूमत चालत होती
पेनगुंडा गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण टोकावर भामरागड (Bhamragad) तालुक्यात अति दुर्गम व घनदाट जंगलात वसलेला गाव आहे... या भागात आजवर शासनाच्या इतर कुठल्याही विभागाचे वावर नव्हते. पोलीस आणि सुरक्षा दलही त्या परिसरात जात नव्हते.... त्यामुळे पेनगुंडा आणि परिसरातील अनेक गावांवर नक्षलवाद्यांची बिनधास्त हुकूमत चालत होती... मात्र काही दिवसांपूर्वी पेनगुंडा आणि परिसरातील गावांनी एक एक करून नक्षलवाद्यांना गावबंदी जाहीर करत जेवण देणे व इतर मदत करणे बंद केले...
जेसीबीच्या मदतीने झाडी झुडपे छाटून कच्चा रस्ता केला तयार
गावकरी विकासाच्या इच्छेने शासनाकडे पाहत आहे, हे लक्षात आल्यावर गडचिरोली पोलिसांनीही मदतीचा एक हात पुढे करत लगेच पेनगुंडा येथे पोलीस मदत केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला.. मात्र नक्षलवाद्यांच्या या बालेकिल्ल्यात जाऊन पोलीस मदत केंद्राची पारंपरिक पद्धतीने उभारणी शक्य नव्हती.... म्हणून शेकडो पोलीस अनेक डझन गाड्यांमध्ये आवश्यक साहित्य घेऊन एका झटक्यात जंगलात शिरले... अनेक किलोमीटर पर्यंत रस्ता नसताना जेसीबीच्या मदतीने झाडी झुडपे छाटून कच्चा रस्ता तयार केला गेला... मोठमोठ्या ट्रक्समध्ये आवश्यक साहित्य निश्चित काही नेण्यात आले... आणि पेनगुंडा व नेलगुंडा गावाच्या मधोमध पोलीस मदत केंद्र उभारण्यास सुरुवात करण्यात आली... अवघ्या काही तासात पोलिसांनी ही मोहीम फत्ते केल्यामुळे नक्षलवाद्यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात पोलिसांच्या मदत केंद्राची ही उभारणी होत असताना गप्पपणे पाहण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग उरलेला नाही..
इतर महत्त्वाच्या बातम्या
Gadchiroli Crime : स्वत:ची बंदुक हाताळताना 8 राऊंड फायर झाले, 3 गोळ्या छातीत घुसल्या, न्यायालयात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसाने जीव गमावला