गडचिरोलीत तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचा इशारा, केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
Gadchiroli News Update : पुढील तीन दिवस गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत.
Gadchiroli News Update : राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. गडचिरोली जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस होत आहे. पुढील तीन दिवस देखील जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत.
पुढील तीन दिवस म्हणजे 13 जुलै पर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालये बंद असतील. परवानगी देण्यात आलेल्या सेवांशिवाय इतर सर्व कँटीन सेवा बंद राहतील. सर्व खासगी कार्यालये, खासगी आस्थापना बंद असतील. याबरोबरच अत्यावश्यक सेवेशी संबंधित दुकाने सुरु राहतील तर इतर दुकाने तीन दिसाच्या कावालधीत इतर दुकाने बंद असतील, असे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
या सेवा राहणार सुरू
रूग्णालये, रूग्ण तपासणी केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, औषध निर्माण कार्यशाळा, औषध निर्माण करण्याच्या कंपन्या, औषधी विक्री केंद्र आणि वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत आस्थापना, पशुवैद्यकीय बाबी. किराणामाल दुकान, भाजी विक्रीची दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई विक्रीची दुकाने, खाद्यपदार्थ विक्री केंद्र. कोल्ड स्टोरेज आणि वेअरहाऊसिंग सर्विसेस, रेल्वे, टॅक्सी, ॲटोरिक्शा, सार्वजनिक वाहतूक बसेस, स्थानिक प्रशासनाद्वारा करावयाची मान्सूनसंबंधी कामे, स्थानिक संस्थाव्दारा पार पाडल्या जाणारी सर्व सार्वजनिक स्वरूपाची कामे, टेलिकॉम क्षेत्राशी निगडीत देखभाल/दुरुस्ती इत्यादी कामे, मालवाहतूक, पाणी पुरवठाशी निगडीत सेवा, शेती क्षेत्राशी निगडीत सेवा, ई- कॉमर्स (केवळ अत्यावश्यक सेवेशी संबंधित बाबींना परवानगी असेल). प्रसार माध्यमे, पेट्रोल पंप, इंधन गॅस सेवा सुरू राहील. याबरोबरच सर्व शासकीय व निम-शासकीय कार्यालये नियमितपणे सुरु असतील.
गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सूचनांचे पालन करुन खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या