(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गडचिरोली लोहखनिज प्रकल्पाच्या अनुमतीसाठी आज जनसुनावणी; प्रकल्पाचा स्थानिकांना फायदा होणार असल्याचा संचालकांचा दावा
Gadchiroli News: नक्षलग्रस्त गडचिरोलीच्या जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील झेंडेपार इथे 46 हेक्टरमध्ये लोहखनिज प्रकल्प सुरु होत आहे. या प्रकल्पाच्या पर्यावरण परवानगीसाठी शासनानं आज गडचिरोलीत जनसुनावणी ठेवली आहे.
Gadchiroli Iron Project: गडचिरोली (Gadchiroli News Updates) जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील झेंडेपार लोहखनिज प्रकल्पासंदर्भात (Gadchiroli Iron Project) आज पर्यावरण विभागाची गडचिरोली येथे सुनावणी जनसुनावणी पार पडणार आहे. कोरची तालुक्यातील झेंडेपार इथे 46 हेक्टरमध्ये लोहखनिज प्रकल्प सरू होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, यासाठी एकही गाव विस्थापित केलं जाणार नाही, तसेच, स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, असा दावा प्रकल्प संचालकांकडून केला जात आहे. दरम्यान, सूरजागड प्रकल्पाच्या (Surajgad Project) अनुभवामुळे स्थानिकांकडून कोरची तालुक्यातील लोहखनिज प्रकल्पाला विरोध केला जात आहे.
नक्षलग्रस्त गडचिरोलीच्या जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील झेंडेपार इथे 46 हेक्टरमध्ये लोहखनिज प्रकल्प सुरु होत आहे. या प्रकल्पाच्या पर्यावरण परवानगीसाठी शासनानं आज गडचिरोलीत जनसुनावणी ठेवली आहे. हा प्रकल्प 46 हेक्टरमध्ये म्हणजे, अगदी छोटा असून यामध्ये एकही गाव विस्थापित होणार नाही आहे. तर सोबतच या प्रकल्पात स्थानिकांनाच रोजगार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा स्थानिकांना फायदा होणार असल्याचं प्रकल्प संचालकांकडून सांगण्यात येत आहे.
गडचिरोली लोहखनिज प्रकल्प संचालक अनुज अग्रवाल म्हणाले की, "गडचिरोतील हा प्रकल्प लोहखनिजाचा आहे. तसेच, हा प्रकल्प 46 हेक्टरवर असून खूपच छोटासा आहे. इथल्या स्थानिक लोकांनाच जास्तीत जास्त रोजगार मिळणार आहे. याव्यतिरिक्त पायाभूत, आरोग्याच्या दृष्टीनं ज्या आवश्यक गोष्टी आहे, त्यासुद्धा केल्या जातील. या प्रकल्पामागील मूळ हेतू हाच आहे की, तिथल्या युवा, बेरोजगारांना जास्तीत जास्त काम मिळावं. या प्रकल्पासाठी अधिकच्या जागेची अजिबात गरज नाही. तसेच, कोणालाही विस्थापित केलं जाणार नाही." याव्यतिरिक्त सरकारला या प्रकल्पामुळे महसूल मिळणार आहे. तसेच, या प्रकल्पाच्या ठिकाणी काही शैक्षणिक संस्थाही उभारल्या जाणार आहेत, ज्याचा फायदा स्थानिकांना होणार असल्याचंही संचालकांनी सांगितलं.
नेमका हा प्रकल्प कसा असणार?
हा लोहखनिज प्रकल्प झेंडेपार गावापासून 3 किलो मीटर अंतरावर आहे
प्रकल्पाची जागा महसूल विभागाची असून त्यावर दगड पहाड, डोंगर असल्याची नोंद आहे
2003 मध्ये या क्षेत्राला खाणक्षेत्र म्हणून आरक्षित करण्यात आले
या प्रकल्पातून मिळालेल्या राजस्वाचा 30 टक्के निधी शासन स्थानिक विकासावर खर्च करणार आहे
या प्रकल्पात 80 टक्के स्थानिकांना नोकरी देण्यात येणार आहे