एक्स्प्लोर

Gadchiroli Naxal : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्षली कारवायांना ऊत; गडचिरोली-छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी केला नक्षल कॅम्प उद्ध्वस्त

Naxal : ऐन निवडणुकांपूर्वी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या नक्षलवाद्यांच्या तळावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यात अनेक स्फोटके आणि मोठ्या प्रमाणात इतर वस्तू जप्त करण्यात पोलिसांना यश आले.

Gadchiroli Naxal गडचिरोलीदेशभरात लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha 2024) रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात करण्याचा उद्देशाने गडचिरोली-छत्तीसगडच्या सीमेलगत गेल्याकाही दिवसांमध्ये  नक्षलवाद्यांचा (Naxal) वावर वाढला असल्याचे समोर आले आहे. या नक्षलवाद्यांच्या कारवाई विरोधात पोलिसांनी देखील आपली कंबर कसली असून प्रत्येक बारीक सारिक गोष्टींकडे पोलीस लक्ष देऊन आहे. अशातच, ऐन निवडणुकांपूर्वी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या या नक्षलवाद्यांच्या तळावर पोलिसांनी (Gadchiroli Police) मोठी कारवाई केली आहे. यात अनेक स्फोटके आणि मोठ्या प्रमाणात इतर वस्तू जप्त करण्यात पोलिसांना यश आले.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नक्षली कारवायांना ऊत

गडचिरोली पोलिसांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलविरोधी अभियान आधिक तीव्र केले आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा एक विश्वासार्ह माहिती मिळाली की,  कसनसूर चातगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र कॅडर गडचिरोली-छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील चुटीनटोला गावाजवळ (एसपीएस पेंढरीपासून 12 किमी पूर्वेला) तळ ठोकून आहेत. तसेच आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्यासाठी त्यांची रणनीती असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली.

या माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सी- 60 युनिटच्या  नक्षलविरोधी ऑपरेशन टीमने तात्काळ त्या दिशेने मोर्चा वळवला. दरम्यान, या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू असता, काल 30 मार्चला ते एका उंच टेकडीवर पोहचले. मात्र त्यावेळी पोलिसांच्या आगमनाची चाहूल लागताच जंगलात तळ ठोकून असलेल्या नक्षलवाद्यांनी येथून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी या परिसराची पाहणी केली असता सुरक्षा दलाच्या पथकाला या डोंगरमाथ्यावर एक मोठे आश्रयस्थान आणि नक्षल छावणी आढळून आली. या छावणीतील सर्व नक्षल साहित्य पोलिसांनी जप्त करून ही छावणी नष्ट करण्यात आली असून या नक्षल्यांचा पुढील शोध सध्या पोलीस घेत आहे. 

घटनास्थळी मिळालेले नक्षल साहित्य 

कॉर्डेक्स वायर, डिटोनेटर, जिलेटिन स्टिक्स, बॅटरी, वॉकी टॉकी चार्जर, बॅकपॅक इत्यादींचा मोठ्या प्रमाणात नक्षलवादी सामान आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त करत ही छावणी नष्ट केली आहे. तसेच ही कारवाई यशस्वी करून सी-60 युनिटचे पथक आज सुखरूपपणे गडचिरोलीला पोहोचले आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Embed widget