भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीत पूरस्थिती कायम; अनेक मार्ग अजूनही बंद, अनेकांचं स्थलांतर
गेल्या चार दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका संपर्काबाहेर होता. आता पूर ओसरायला सुरुवात झाली असून गावात पूर्ण चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
गडचिरोली : गडचिरोली, भंडारा-गोंदिया आणि चंद्रपुरात पूरस्थिती कायम आहे. गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पुराच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. पूरस्थितीमुळे गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात अनेक मार्ग बंद आहेत. तसंच पूराचा फटका बसलेल्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलंय. तसंच पुराचा धोका वाढण्याच्या शक्यतेनं नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
गेल्या चार दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका संपर्काबाहेर होता. गावात पाणी शिरल्याने अनेक घरं पाण्याखाली आली होती. आता पूर ओसरायला सुरुवात झाली असून गावात पूर्ण चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. तरीही पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली असल्याने पूरपरिस्थिती कायम आहे. आज मोबाईलसेवा सुरळीत झाल्याने जिल्हा मुख्यालयाशी संपर्क झाला आहे.
दोन दिवसाआधी भामरागड शहराला बेटाचे स्वरूप आले होते. चक्क शहरात बोटी चालत होत्या दोनशेहून अधिक लोकांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. छत्तीसगढ राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे भामरागड इंद्रावती नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. या पुराचं प्रवाह इतका मोठा होता की शहरातील दोनशेहून अधिक घरे पाण्याखाली आली त्यानंतर आज भामरागडशी अखेर संपर्क झाला.
पावसामुळे शाळांना सुट्टी
भंडारा जिल्हातील पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय शाळा, अंगणवाडी, शिकवणी वर्ग बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. नदी नाल्यांना पूर आल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर अनेक ठिकाणी या पावसाचा शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये भंडारा आणि गोंदियाचा समावेश आहे. या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असून नदी नाल्यांना पूर आला आहे. याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर दुसरीकडं मुंबईसह परिसरात देखील चांगला पाऊस कोसळत असल्याचे चित्र आहे. नाशिकमध्येही चांगला पाऊस पडत आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यासह कोल्हापूरमध्येही काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह परिसरात चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. मुंबईसह उपनगरांतही चांगला पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळं वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Maharashtra Rain : भंडारा गोंदियात जोरदार पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम
- Aurangabad: जायकवाडी धरणातून विसर्ग वाढवला, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- Bhandara Rain : भंडाऱ्यासह गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये पूरस्थिती कायम, भंडारा जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना