एक्स्प्लोर
“सेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीतून चहा-भजी खाऊन निघून जातात”
महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घ्यायला हरकत नाही. मात्र निवडणुकीत लोकांची विश्वासार्हता जपणं ही सरकारची जबाबदारी असल्याच त्यांनी सांगितलं.

जालना : शिवसेनेचे मंत्री चहा, भजी, समोसे खाऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीतून निघून जातात, असा टोला राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेला हाणला आहे. त्याचबरोबर, काँग्रेसच देशात मुख्य विरोधी पक्ष आहे, असेही ते म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी जालना शहरात व्यापाऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत व्यापाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं. महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घ्यायला हरकत नाही. मात्र निवडणुकीत लोकांची विश्वासार्हता जपणं ही सरकारची जबाबदारी असल्याच त्यांनी सांगितलं. सरकारला कोळशाची उपलब्धता सांभाळता न आल्याने राज्यभरात सध्या लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात होत असल्याची टीका देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
आणखी वाचा























