एक्स्प्लोर
अबब... शपथविधीच्या सोहळ्यांवर कोट्यवधींची उधळण, ठाकरे सरकारकडून रोषणाईसाठीच पावणेतीन कोटी खर्च
अवघ्या दहा मिनिटांच्या या सोहळ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यावेळी फडणवीस सरकारवर टीका देखील झाली होती. मात्र हाच कित्ता गिरवत ठाकरे सरकारने देखील शपथविधी सोहळ्यासाठी तिप्पट जास्त खर्च केल्याचे उघड झाले आहे.
उस्मानाबाद : महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर राजभवनाच्या बाहेर शपथविधी घेण्याची प्रथा पडत चालली आहे. त्यामुळे अतिरिक्त खर्च राज्याच्या तिजोरीला सहन करावा लागताे. 2014 साली आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने वानखेडे स्टेडिअमवर शपशविधी झाला होता. तर 2019 मध्ये आलेल्या ठाकरे सरकारने शिवाजी पार्कावर भव्य सोहळा घेऊन शपथविधी केला. या दोन्ही शपथविधीच्या कार्यक्रमाला सरकारी तिजोरीतून पैसा खर्च झाला. देवेंद्र फडणवीस सरकारने केलेल्या शपथविधीच्या खर्चावर टीका करणारे तत्कालीन विरोधक आणि सध्या महाविकास आघाडीत असलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस सहभागी असलेल्या ठाकरे सरकारने फडणवीस सरकारपेक्षा तिप्पट जास्त खर्च शपथविधीवर केला आहे.
उस्मानाबादमधील निखील चनभट्टी या माहिती अधिकार कार्यकर्त्याने यासंदर्भात माहिती अधिकारातून माहिती मागितली होती. 2014 देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे स्टेडियममध्ये शपथविधी घेतला. त्यावेळी वानखेडे स्टेडियमच्या विद्युत रोषणाई वरती 30 लाख 60 हजार 670 रुपये खर्चाआला. तर वानखेडेवरील शामियाना सजवण्यासाठी 67 लाख 670 रुपये खर्च आला. फडणवीस सरकारच्या शपथविधीसाठी एकूण 98 लाख 37 हजार 950 रुपये खर्च झाले.
तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवाजी पार्कवर ती शपथविधी सोहळा झाला. त्यासाठी 2 कोटी 79 लाख 7 हजार 374 रुपये खर्च आला. यामध्ये तीन लाखांची पुष्प सजावट आणि सुमारे पावणेतीन कोटींचा खर्च हा केवळ विद्युत रोषणाईसाठी करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.
निखील चनभट्टी यांनी माहिती अधिकारात 2009 ते 2019 पर्यंतच्या काळात झालेल्या शपथविधीसाठी आलेल्या खर्चाची माहिती विचारली होती. त्यांना 2009 ते 2012 या कालावधीतील शपथविधी माहिती मात्र मिळू शकली नाही. 21 जून 2012 च्या मंत्रालयातील आगीत कागदपत्रं जळाली असल्यानं त्याआधीची माहिती मिळू शकत नाही असं त्यांना कळवण्यात आलं आहे.
महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासह सात कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांनी वानखेडे मैदानावर शपथ घेतली होती. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ही शपथ दिली. अवघ्या दहा मिनिटांच्या या सोहळ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यावेळी फडणवीस सरकारवर टीका देखील झाली होती. मात्र हाच कित्ता गिरवत ठाकरे सरकारने देखील शपथविधी सोहळ्यासाठी तिप्पट जास्त खर्च केल्याचे उघड झाले आहे.
संबंधित बातम्या
ठरलं! अजित पवार उपमुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार
उद्धव ठाकरेंचा शपथविधी सोहळा सर्व नियमांची पूर्तता करुनच, बीएमसी प्रशासनाचा हायकोर्टात युक्तिवाद
'ठाकरे सरकार'वर शिक्कामोर्तब, बहुमत चाचणीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पास
Bhagat Singh Koshyari | महाविकासआघाडीच्या शपथविधी सोहळ्यावर राज्यपाल कोश्यारी नाराज : सूत्र | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
बीड
Advertisement