एक्स्प्लोर

मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड

शुक्रवारी रात्री अमली पदार्थ विरोधी पथकानं मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीमध्ये धाड टाकली आणि स्पा सेंटरचा धक्कादायक खुलासा झाला. अमली पदार्थविरोधी पथकाने या प्रकरणात एकूण नऊ मुलींची सुखरूप सुटका केली तर एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई : मुंबईच्या दादरसारख्या भागात उच्चभ्रू परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालत असल्याचा धक्कादायक प्रकार अमली पदार्थविरोधी पथकाने उघडकीस आणला आहे. स्थानिक पोलिसांच्या हातावर तुरी देऊन हे स्पा सेंटर गेल्या अनेक दिवसांपासून एका रहिवाशी इमारतीमध्ये चालल होतं. धक्कादायक म्हणजे या सोसायटीत माजी पोलीस अधिकारी, राजकीय नेते आणि अनेक प्रसिद्ध खेळाडू वास्तव्यास आहेत. मात्र स्थानिक पोलिसांना याची माहिती मिळूनसुद्धा काहीच हाती लागले नव्हते. मात्र खबर्‍याने दिलेल्या माहितीनुसार अमली पदार्थविरोधी पथकाने या रहिवासी इमारतीमध्ये धाड टाकली आणि स्पा सेंटरच्या नावाखाली चालत असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. दादरमधल्या प्रभादेवी परिसरात असणाऱ्या एका उच्चभ्रू रहिवासी इमारती ते स्पा सेंटर चाललं होतं. या इमारतीत अनेक सुशिक्षित लोक वास्तव्याला आहेत. शुक्रवारी रात्री अमली पदार्थ विरोधी पथकानं मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीमध्ये धाड टाकली आणि स्पा सेंटरचा धक्कादायक खुलासा झाला. अमली पदार्थविरोधी पथकाने या प्रकरणात एकूण नऊ मुलींची सुखरूप सुटका केली तर एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. गेले काही दिवसांपासून अमली पदार्थ विरोधी पथक वेगवेगळ्या कारवाई करत आहे. याच अंतर्गत तपास करत असताना या स्पा सेंटरचा खुलासा झाला आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने या प्रकरणामध्ये अटक केलेल्या मुख्य आरोपीचं नाव सलीम शेख अस आहे. त्याचबरोबर हे सगळ्या प्रकरणात महत्वाची भूमिका सांभाळणाऱ्या काही मुलींनासुद्धा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाने या इमारतीत धाड टाकून जवळपास साडे बारा हजार रुपयांची रक्कम सुद्धा जप्त केली आहे. पिटा अॅक्ट प्रमाणे या संपूर्ण प्रकरणात कारवाई करण्यात आलेली असून सर्व मुलींना शिवडी न्यायालयात आज हजर करण्यात आले. मुख्य आरोपी सलीम शेख त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतके दिवस सुरु असलेले हे रॅकेट उघड झाल्याची गोष्ट समजताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget