Ek Villain 2 | 'एक व्हिलन 2'च्या सीक्वेलमध्ये आदित्य रॉय कपूरसोबत दिसणार तारा सुतारिया
'एक व्हिलन' 2014 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट एका रोमॅन्टिक कथेवर आधारित होता. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचा सीक्वेल 'एक व्हिलन 2' पुढच्या वर्षी 8 जानेवारी रोजी रिलीज करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया लवकरच आपल्या आगामी चित्रपटात दिसून येणार आहे. 'स्टुडेंट ऑफ द ईयर 2'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी तारा आता मोहित सूरीचा आगामी चित्रपट 'एक व्हिलन 2'मध्ये दिसणार आहे. चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता आदित्य रॉय कपूरही दिसून येणार आहे. तसेच या चित्रपटात जॉन अब्राहम आणि दिशा पाटनीही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन मोहित सूरी करणार असून एकता कपूर आणि भुषण कुमार चित्रपटाची निर्मीत करणार आहेत.
'एक व्हिलन 2'चे दिग्दर्शक मोहित सूरी यांनी सांगितले की, 'चित्रपट एका गायिकेच्या जीवनावर आधारीत आहे. जिने आपलं संपूर्ण जीवन संगीतासाठी वाहून दिलं. तारा याच गायिकेची भूमिका साकरणार आहे. या चित्रपटाचं शुटिंग यावर्षाच्या मध्यापर्यंत सुरू होणार आहे.'
चित्रपटामध्ये ताराच्या भूमिकेबाबत बोलताना मोहित सूरी म्हणाले की, 'एका दिग्दर्शकासाठी कोणत्याही कलाकाराला एखाद्या संगीतकाराच्या रूपात आणणं अत्यंत अवघड असतं. पुढे बोलतान ते म्हणाले की, 'ताराकडे नव्या युगाचा एक ऑनेस्ट नॅचरल आवाज आहे. जो तिच्या चित्रपटातील भूमिकेसाठी अगदी फिट आहे.
दरम्यान, 'एक व्हिलन' 2014 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट एका रोमॅन्टिक कथेवर आधारित होता. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचा सीक्वेल 'एक व्हिलन 2' पुढच्या वर्षी 8 जानेवारी रोजी रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटात अभिनेता आदित्य रॉय कपूर, तारा सुतारिया, जॉन अब्राहम आणि दिशा पाटनी दिसून येणार आहेत. 'एक व्हिलन 2' या चित्रपटाची निर्मिती बालाजी मोशन पिक्चर्स अॅन्ड टिसीरीज एकत्र येऊन करणार आहेत.
संबंधित बातम्या :
ऑलिव्ह ग्रीन ड्रेसमध्ये सारा अली खानचा क्लासी लूक; चाहते म्हणाले, 'माशाल्लाह'
PHOTO : 'मलंग'च्या प्रमोशदरम्यान स्पॉट झाली दिशा पाटनी; लूक होतोय व्हायरलSooryavanshi Teaser | बहुप्रतीक्षित 'सूर्यवंशी'चा हटके टीझर प्रदर्शित