Earthquake In Kargil : होळीच्या पहाटेच भूकंपाचे धक्के! लडाखपासून ते 'या' भागांना बसला हादरा
Earthquake: भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळी आज(14 मार्च) सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. लडाख आणि जम्मू-काश्मीरमध्ये रात्री 2.50 वाजता आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले.

Earthquake In Kargil : होळीच्या (Holi 2025) दिवशीच भारताच्या उत्तर भागात पहाटे भूकंपाचे धक्के (Earthquake) जाणवले असल्याच्या माहिती समोर आली आहे. लडाखच्या कारगिलमध्ये 5.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला असल्याचे नोंदवण्यात आले आहे. रात्री 2.50 वाजता हे धक्के जाणवले असून कारगिलसोबतच संपूर्ण लडाख आणि जम्मू-काश्मीरच्या काही भागात हे धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू 15 किलोमीटर खोलीवर होता. या भूकंपानंतर अवघ्या तीन तासांनी उत्तर-पूर्व भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले. अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग भागात 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप झालाय. सकाळी सहा वाजता येथे भूकंपाचे धक्के जाणवले. तर 13 मार्च रोजी दुपारी 2 वाजता तिबेटमध्ये 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला असल्याचे नोंदवण्यात आले आहे.
लेह आणि लडाखमध्ये सतत येत असतात भूकंप
लेह आणि लडाख हे दोन्ही भाग भूकंपाच्या झोन-IV मध्ये येतात, याचा अर्थ भूकंपाच्या दृष्टीने ते अतिशय उच्च जोखमीचे क्षेत्र आहेत. टेक्टोनिकली सक्रिय हिमालयीन प्रदेशात स्थित असल्याने, लेह आणि लडाखमध्ये भूकंप वारंवार होतात. भूतकाळातील भूकंप आणि त्या क्षेत्राच्या टेक्टोनिक रचनेशी संबंधित वैज्ञानिक माहितीच्या आधारे देशातील भूकंप संवेदनशील क्षेत्रे ओळखली जातात. या माहितीच्या आधारे देशाची चार भूकंपीय क्षेत्रांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. झोन V, IV, III आणि II. झोन-V सर्वात संवेदनशील आहे, तर झोन-II सर्वात कमी संवेदनशील आहे.
EQ of M: 5.2, On: 14/03/2025 02:50:05 IST, Lat: 33.37 N, Long: 76.76 E, Depth: 15 Km, Location: Kargil, Ladakh.
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) March 13, 2025
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia pic.twitter.com/7SuSEYEIcy
सोशल मीडियावर नागरिकांनी शेयर केला अनुभव
रात्री झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू कारगिलमध्ये होता, परंतु जेव्हा त्याचे धक्के जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले तेव्हा जम्मू आणि श्रीनगरसह अनेक भागातील सोशल मीडिया युजर्सनी त्यांची कहाणी आणि अनुभव शेअर केला आहे. रात्री उशिरा झालेल्या या भूकंपानंतर त्यांच्या शहरात काय घडले हे ते त्यांनी सांगितले आहे. परिणामी अनेक भागात सध्या चिंतेचे वातावरण आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

