Dunki Trailer Out : शाहरुखच्या 'डंकी'चा धमाकेदार ट्रेलर आऊट! चाहत्यांना आता सिनेमाची प्रतीक्षा
Shah Rukh Khan Film Dunki Trailer : शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Shah Rukh Khan Movie Dunki Trailer : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी 'डंकी' (Dunki) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमासंदर्भातील प्रत्येक अपडेट्स चाहते आवडीने जाणून घेत आहेत. आता शाहरुखच्या 'डंकी' (Dunki Trailer Out) या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. धमाकेदार ट्रेलर रिलीज झाल्याने चाहत्यांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
शाहरुखने शेअर केला 'डंकी'चा ट्रेलर! (Shah Rukh Khan Shared Dunki Trailer)
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने 'डंकी' या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करत त्याने लिहिलं आहे,"हा प्रवास मी लालटूहून सुरू केली होती. आता याचा शेवटही माझ्या खास मित्रांसोबत मी करणार. 'जर्नी'चा ट्रेलर एक प्रवास दाखवणारा आहे. वेड्या मित्रांची मजेशीर गोष्ट प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळेल. विनोदासह कुटुंबासोबतच्या जुन्या आठवणी तुम्हाला आठवतील. प्रतीक्षा संपली.. #DunkiDrop4 - रिलीज. 'डंकी' 21 डिसेंबर 2023 रोजी जगभरातील सिनेमागृहात होणार प्रदर्शित".
'डंकी'चा ट्रेलर कसा आहे?
'डंकी' या सिनेमाचा ट्रेलर 3 मिनिट 2 सेकंदाचा आहे. या सिनेमाच्या सुरुवातीला हार्डी (शाहरुख खान) आपली गोष्ट सांगताना दिसत आहे. लालतूमध्ये 1995 मध्ये घडलेल्या घटनेवर भाष्य करताना तो दिसत आहे. लाफ्टर, इमोशन आणि ड्रामा अशा सर्व गोष्टी असलेली रोलर कोस्टर राईड या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. विदेशात जाण्याची इच्छा असलेल्या मित्रांची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
शाहरुखचा 'डंकी' कधी रिलीज होणार? (Dunki Release Date)
शाहरुखच्या 'डंकी'चा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 'डंकी' हा सिनेमा 21 डिसेंबर 2023 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. गौरी खान, जियो स्टूडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्स प्रोडक्शनच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. येत्या नाताळात हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे.
'डंकी' या सिनेमात शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे. तापसी पन्नू, बोमन ईरानी, विकी कौशल, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोवर हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अभिजात जोशी, राजकुमार हिरानी आणि कनिला ढिल्लो यांनी या सिनेमाची कथा लिहिली आहे. 'पठाण' आणि 'जवान'नंतर 'डंकी' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी किंग खान सज्ज आहे.
ट्रेलर पाहा :
संबंधित बातम्या