एक्स्प्लोर

दिंडोशी न्यायालयात न्यायाधीशांवर भिरकावली लोखंडी सळी, आरोपी ताब्यात

या हल्ल्यात दंडाधिकारी थोडक्यात बचावले असले तरी अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सगळीकडे एकच गोधंळ उडाली. तेव्हा, सळी भिरकावणा-या या आरोपीला पोलिसांनी लगेचच पकडून अटक केली.

मुंबई : भारतात अनेक ठिकाणी आपला राग व्यक्त करण्यासाठी नेते मंडळी अथवा पुढाऱ्यांवर सर्वसामान्य अथवा कार्यकर्ते हे चप्पल, बुट फेकून मारण्याचे प्रकार सर्रास पहायला मिळतात. मात्र, हल्ली न्यायव्यवस्थाही याला अपवाद नाही. गुरुवारी मुंबईतील दिंडोशी दंडाधिकारी न्यायालयात चक्क वकीलांचा काळा कोट घालून आलेल्या व्यक्तीनं थेट न्यायाधिशांवरच लोखंडी सळी भिरकावण्याचा प्रकार केला. या घडलेल्या प्रकारामुळे गोंधळ उडाला असून याची गंभीर दखल घेत दिंडोशी कोर्टात येणाऱ्या वकिलांची त्यांच्या सामानासकट कसून तपासणी करण्याचे निर्देश मुख्य न्यायाधीशांनी दिले आहेत. मुंबई उपनगरातील दिंडोशी सत्र न्यायालयातील एस. यु. बघेले यांच्या कोर्ट क्रमांक 10 मध्ये गुरूवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एका खटल्यावर सुनावणी सुरू होती. त्यावेळी वकिलाच्या वेशातील एका व्यक्तीने दंडाधिकारी न्यायाधीश बघेल यांच्यावर एक लोखंडी सळी भिरकावून हल्ला केला. या हल्ल्यात दंडाधिकारी थोडक्यात बचावले असले तरी अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सगळीकडे एकच गोधंळ उडाली. तेव्हा, सळी भिरकावणाऱ्य़ा या आरोपीला पोलिसांनी लगेचच पकडून अटक केली. ओमकारनाथ पांडेला (60) असं या व्यक्तीचं नावं आहे. पांडे हा साकीनाका परिसरात राहत असून तो एका हत्येच्या खटल्यात साक्षीदार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कृष्णजन्मानिमित्त ही लोखंडी बासरी आपण न्यायाधीशांना दिल्याचा त्याचा दावा आहे. या घटनेनंतर दिंडोशी सत्र न्यायालयातील सुरक्षितेत वाढ करण्यात आली असून यापुढे दिंडोशी न्यायालयात येणाऱ्या वकिलांचीही त्यांच्या सामानासह कसून तपासणी करण्याचे आदेश सत्र न्यायालयाचे अतिरिक्त प्रमुख न्यायाधीश एस. एम. शर्मा यांनी तातडीनं जारी केलेल्या निर्देशात म्हटले आहे. तसेच सर्व वकिलांनाही त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पत्रकातून करण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget