एक्स्प्लोर

Dhule News : तहानलेला बिबट्या पाण्याच्या शोधात आला गोठ्यात, हंड्यात अडकली मान, अथक प्रयत्नाअंती सुटका 

Dhule Leopard News : पाणी आणि भक्ष्याच्या शोधात आलेल्या मादी बिबट्याची (Leopard) मान पाण्याच्या हंड्यात अडकल्याची घटना साक्री तालुक्यातील धुकशेवड गाव शिवारातील गोठ्यात घडली.

Dhule Leopard News धुळे : पाणी आणि भक्ष्याच्या शोधात आलेल्या मादी बिबट्याची (Leopard) मान पाण्याच्या हंड्यात अडकल्याची घटना साक्री तालुक्यातील धुकशेवड गाव शिवारातील गोठ्यात घडली. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व पशुवैद्यकीय डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले. 

पशुवैद्यकीय डॉक्टरांनी यांनी भुलीचे इजेक्शन देवून बिबट्याला बेशुध्द करण्यात आले. त्यानंतर हंडा काढून बिबट्याची सुटका करण्यात आली. त्याला पिंजऱ्यात ठेवून जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती कोंडाईबारी वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी सविता सोनवणे यांनी दिली.

पाणी पिण्यासाठी हंड्यात घातली मान

साक्री तालुक्यातील कोंडाईबारी वन क्षेत्रातील जयरामनगर पैकी धुकशेवड शिवारातील कृष्णा नारायण चौरे (रा.देवळीपाडा) यांच्या शेतात गुरांच्या वाड्यात भक्ष व पाण्याच्या शोधात एक मादी जातीचा बिबट्या आला. तांब्याच्या हंड्यात पाणी असावे म्हणून त्याने पिण्यासाठी मान आत घातली, मात्र त्याची मान या हंड्यात अडकली. त्यानंतर तो वाड्याच्या आजूबाजूला सैरावैरा पळत सुटला बिबट्या पूर्णतः हैराण होऊन दमून वाड्यात जाऊन बसला. 

शेतमालकाने वन अधिकाऱ्यांना दिली माहिती

ही घटना पाहून शेतमालकाने पहाटे तीन वाजता वन अधिकारी सविता सोनवणे यांना फोनद्वारे माहिती दिली. त्यांनी ही बाब उपवनसंरक्षक नितीन कुमारसिंग यांना कळवली. त्यानंतर पिंजऱ्यासह वन कर्मचारी व वन्यजीव संस्था, पिंपळनेरचे पथक व पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन कापडणीस, तसेच पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बिबट्याची मान अडकल्यामुळे तो थकला होता. त्याला पुरेसा ऑक्सिजन मिळत नव्हता.

मान हंड्यात अडकल्याने बिबट्याला ऑक्सिजनची कमतरता  

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इंजेक्शनद्वारे भूल देऊन त्यास बेशुद्ध केले. पिंजऱ्यामध्ये टाकून त्याला पिंपळनेर वनविभागाच्या आवारात आणण्यात आले. या ठिकाणी साक्री तालुक्याचे पशुधन आयुक्त अधिकारी डॉ.योगेश गावित, डॉ.मंगेश हेमाडे,डॉ.संदीप कोकणी,डॉ.शंकर आस्वार, डॉ. राहुल पाटील यांनी या बिबट्यास पुन्हा इंजेक्शन द्वारा भूल दिली. बिबट्यास ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्याची मान आतमध्ये अडकल्याने तो अतिशय बेभान झालेल्या असल्यामुळे शक्य झाले नाही. त्यानंतर येथील कारागीर मुस्ताक शेख यांनी कटरच्या साह्याने तांब्याच्या हंड्याला दोन ते तीन ठिकाणी चरे देऊन ऑक्सिजन आत पोहोचेल अशी योजना केली. बिबट्याला ऑक्सिजन मिळताच बिबट्या सुस्थितीत आला. 

अखेर बिबट्याला मान हंड्यातून काढण्यात यश

एकीकडे हंडा पकडून व एका बाजूने बिबट्याची शेपूट पकडून हंडा ओढला असता बिबट्याची मान सुखरूप बाहेर निघाली. पुन्हा बिबट्याला पिंजऱ्यात ठेवण्यात आले. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्याची तब्येतीत आता सुधारणा आहे. बिबट्यास सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात येणार असल्याचे वनक्षेत्रपाल अडकिने, वन अधिकारी सविता सोनवणे यांनी सांगितले.

आणखी वाचा 

Indian Navy : भारतीय नौदलाचा खलाशी जहाजातून बेपत्ता झाल्याची माहिती, शोध मोहीम सुरू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेखTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07.30 PMABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 07 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 Nov ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget