एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Elections 2024 : धुळे शहर विधानसभा मतदारसंघात मविआत इच्छुकांची धाकधूक वाढली, कुणाला मिळणार संधी? कुणाचा पत्ता कट?

Dhule City Assembly Constituency : धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आता वाढू लागली आहे.

Maharashtra Assembly Elections 2024 : धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून (Dhule City Assembly Constituency) महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आता वाढू लागली आहे. शहर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे (Shiv Sena Thackeray Group) पक्षाला मिळणार असल्याची जवळपास निश्चित झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, दुसरीकडे पक्षातील इच्छुकांची धाकधूक वाढली असून कोणाला संधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता जोरदार सुरुवात झाली असून अवघ्या काही दिवसात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या जागा वाटपांचा प्रश्न पूर्णतः निकाली निघणार आहे. कोणत्या पक्षाला कोणत्या विधानसभा मतदारसंघाची जागा जाणार? हे आता जवळपास निश्चित होऊ लागले आहे. यामुळे इच्छुकांची धाकधूक देखील वाढू लागली आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेना ठाकरे पक्षाला मिळणार की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळणार याची उत्सुकता वाढू लागली आहे. दोन्ही पक्षांकडून शहर विधानसभा मतदारसंघावर दावा केला जात आहे. मात्र, असं असताना दोन्ही पक्षातील इच्छुकांची मात्र धाकधूक वाढली आहे. 

'हे' आहेत प्रमुख दावेदार 

महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे पक्षातून युवा सेनेचे राज्यसहसचिव असलेले अ‍ॅड. पंकज गोरे, डॉ. सुशील महाजन आणि महेश मिस्तरी हे प्रमुख पदाधिकारी धुळे शहर विधानसभेच्या मतदारसंघातून प्रमुख दावेदार मानले जात आहेत. मात्र, दुसरीकडे अद्यापही पक्षाकडून जागेच्या संदर्भात आणि उमेदवारीच्या संदर्भात कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही. 

पंकज गोरेंनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट 

ठाकरे गटाच्या युवा सेनेचे राज्यसहसचिव अ‍ॅड. पंकज गोरे हे 2009 सालापासून पक्षात कार्यरत असून सिद्धिविनायक ट्रस्ट येथे ट्रस्टी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाकडून त्यांची युवा सेनेच्या राज्यसहसचिवपदी देखील नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आपण 2009 पासून शासन दरबारी मांडण्यात आले असून हे प्रश्न तात्काळ निकाली काढण्याचे काम आपण केले आहे. यासोबतच कोणतेही संविधानिक पद नसताना जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी अ‍ॅड. पंकज गोरे यांनी आणला आहे. यामुळे शहराच्या विधानसभेसाठी आपला पक्षाने जरूर विचार करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. नुकतीच त्यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

महाजन, मिस्तरी देखील इच्छुक

तसेच डॉ. सुशील महाजन आणि महेश मिस्तरी हे देखील गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना ठाकरे गटात असून विविध सामाजिक कार्यांच्या माध्यमातून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. शहराच्या विकासाचे व्हिजन आपल्याकडे असून पक्षाने आपल्या नावाचा जरूर विचार करावा, अशी मागणी देखील त्यांच्याकडून केली जात आहे. अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणुकीसाठी लांब निर्देशकपत्र दाखल होण्याची वेळ आली असून अद्यापही पक्षाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली नसल्याने इच्छुकांची मात्र धाकधूक वाढली आहे. 

कुणाला मिळणार संधी? कुणाचा पत्ता कट?

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक असून त्यांनी देखील याबाबत उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे. यामुळे आता महाविकास आघाडीत नेमकी संधी कुणाला मिळणार? आणि कुणाचा पत्ता कट होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

आणखी वाचा 

North Maharashtra MLA List : उत्तर महाराष्ट्रात कोणत्या पक्षाची किती ताकद? सर्व आमदारांची यादी वाचा एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Nawaz Sharif on India : जयशंकर पाकिस्तानमध्ये पोहोचताच माजी पंतप्रधानांची भाषाच बदलली! नवाज शरीफ म्हणाले तरी काय?
जयशंकर पाकिस्तानमध्ये पोहोचताच माजी पंतप्रधानांची भाषाच बदलली! नवाज शरीफ म्हणाले तरी काय?
मविआतील नाना पटोले-संजय राऊत वादावर उद्धव ठाकरेंची रिॲक्शन; शरद पवारांचाही दिल्लीला फोन
मविआतील नाना पटोले-संजय राऊत वादावर उद्धव ठाकरेंची रिॲक्शन; शरद पवारांचाही दिल्लीला फोन
संगोल्यात गद्दाराच्या छाताडावर पाय रोवून मशाल विजयी होणार; दीपक साळुंखेंचा प्रवेश अन् ठाकरेंकडून उमेदवारीचे संकेत
संगोल्यात गद्दाराच्या छाताडावर पाय रोवून मशाल विजयी होणार; दीपक साळुंखेंचा प्रवेश अन् ठाकरेंकडून उमेदवारीचे संकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Seat Sharing : संजय राऊतांवर नाना पटोलेंची मविआच्या नेत्यांसमोरच जाहीर नाराजीUddhav Thackeray Shivsena : भाजपचे सुरेश बनकर यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेशUddhav Thackeray Speech : दीपक साळुंंखे हाती मशाल घेऊन विजयाच्या दिशेनं निघालेत- ठाकरेRajan Teli Konkan : सावंतवाडीत केसरकरांना राजन तेली देणार आव्हान?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Nawaz Sharif on India : जयशंकर पाकिस्तानमध्ये पोहोचताच माजी पंतप्रधानांची भाषाच बदलली! नवाज शरीफ म्हणाले तरी काय?
जयशंकर पाकिस्तानमध्ये पोहोचताच माजी पंतप्रधानांची भाषाच बदलली! नवाज शरीफ म्हणाले तरी काय?
मविआतील नाना पटोले-संजय राऊत वादावर उद्धव ठाकरेंची रिॲक्शन; शरद पवारांचाही दिल्लीला फोन
मविआतील नाना पटोले-संजय राऊत वादावर उद्धव ठाकरेंची रिॲक्शन; शरद पवारांचाही दिल्लीला फोन
संगोल्यात गद्दाराच्या छाताडावर पाय रोवून मशाल विजयी होणार; दीपक साळुंखेंचा प्रवेश अन् ठाकरेंकडून उमेदवारीचे संकेत
संगोल्यात गद्दाराच्या छाताडावर पाय रोवून मशाल विजयी होणार; दीपक साळुंखेंचा प्रवेश अन् ठाकरेंकडून उमेदवारीचे संकेत
Child Marriage Act : जीवनसाथी निवडण्याचा सर्वाना अधिकार, बालविवाह बंदी कायदा 'पर्सनल लॉ'मधील प्रथांमुळे थांबवू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
जीवनसाथी निवडण्याचा सर्वाना अधिकार, बालविवाह बंदी कायदा 'पर्सनल लॉ'मधील प्रथांमुळे थांबवू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Maharashtra Vidhan Sabha Election : धनंजय महाडिक अन् सदाभाऊ खोत फडणवीसांच्या भेटीला; कोणत्या मतदारसंघांची केली मागणी?
धनंजय महाडिक अन् सदाभाऊ खोत फडणवीसांच्या भेटीला; कोणत्या मतदारसंघांची केली मागणी?
Maharashtra Assembly Elections 2024 : धुळे शहर विधानसभा मतदारसंघात मविआत इच्छुकांची धाकधूक वाढली, कुणाला मिळणार संधी? कुणाचा पत्ता कट?
धुळे शहर विधानसभा मतदारसंघात मविआत इच्छुकांची धाकधूक वाढली, कुणाला मिळणार संधी? कुणाचा पत्ता कट?
महाविकास आघाडीत मोठी बिघाडी; नाना पटोले असल्यास बैठकीला उपस्थित राहणार नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा
महाविकास आघाडीत मोठी बिघाडी; नाना पटोले असल्यास बैठकीला उपस्थित राहणार नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा
Embed widget