‘महावतार नरसिंह’ची ऑस्करच्या रेसमध्ये बाजी; भगवान विष्णूंच्या अवताराची पौराणिक कथा करणार का 5 सिनेमांवर मात?
' महावतार नरसिंह' या चित्रपटाला ऑस्करच्या ॲनिमेटेड पिक्चर फिल्म्स या श्रेणीसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. जगभरातील 35 शक्तिशाली चित्रपटांमध्ये हा समावेश करण्यात आलाय.

Mahavatar Narsinvha Oscar Entry: भगवान विष्णूच्या वराह आणि नरसिंह अवतारावर आधारित 'महावतार नरसिंह' हा ब्लॉकबस्टर चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीत दाखल झालाय. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फिचर फिल्मस या श्रेणीमध्ये जगभरातील इतर 35 चित्रपटांसाठी निवड झालेल्या फिल्म्समध्ये महावतार नरसिंहही असेल. हा चित्रपट इतर पाच चित्रपटांशी स्पर्धा करेल. (Entertainment)
दिग्दर्शक अश्विन कुमार यांच्या ' महावतार नरसिंह' या पौराणिक ॲनिमेटेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. अवघ्या 40 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने देशांतर्गत 251.30 कोटी तर जगभरात तब्बल 326.82 कोटींची कमाई केली. भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ॲनिमेटेड चित्रपटांचा विक्रम या एकट्या चित्रपटाने मोडला आहे. आता 16 मार्च 2026 रोजी होणाऱ्या 98 व्या अकॅडमी अवॉर्ड्स अर्थात ऑस्करसाठी देशभराच्या आशा या चित्रपटावर आहेत. ' महावतार नरसिंह' या चित्रपटाला ऑस्करच्या ॲनिमेटेड पिक्चर फिल्म्स या श्रेणीसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. जगभरातील 35 शक्तिशाली चित्रपटांमध्ये हा समावेश करण्यात आलाय.
ऑस्कर पात्रता कशी मिळाली?
महावतार नरसिंह हा चित्रपट अमेरिकेतील क्वालिफाइड कमर्शियल थेटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर ऑस्करच्या पात्रतेत आला. ऑस्करच्या पात्रतेच्या नियमानुसार,
अमेरिकेत याच ठिकाणी दिवसातून किमान 3 वेळा आणि सलग 7 दिवस चित्रपट दाखवणे आवश्यक आहे. त्यातील एक शो सायंकाळी 6 ते रात्री 10 या प्राईम टाईममध्ये स्लॉट असणे आवश्यक आहे. हे सर्व निकष पूर्ण केल्यानंतर चित्रपटाला शॉर्टलिस्ट करण्यात आले.
महावतार नरसिंह ही फिल्म भगवान विष्णूंच्या वराह आणि नरसिंह या दोन अवतारांची महाकथा आहे . होम्बले फिल्मस्टच्या बॅनर खाली बनवलेला हा महावतार सिनेमॅटिक युनिव्हर्समधील पहिला भाग आहे. थिएटरनंतर हा सिनेमा आता नेटफ्लिक्सवरही उपलब्ध आहे.
या 5 आंतरराष्ट्रीय चित्रपटांशी कडवी टक्कर
ऑस्करच्या 35 आणि मीटर चित्रपटांच्या यादीत महावितरण नरसिंह या चित्रपटासमोर काही तगड्या चित्रपटांची आव्हानं आहेत. या चित्रपटांमध्ये पाच आंतरराष्ट्रीय चित्रपट आहेत.
1) k-pop demon hunters
2) zootopia 2
3) elio
4) demons layer infinity castle
5) Ne Zha 2
हे चित्रपट जागतिक पातळीवर अत्यंत लोकप्रिय असल्याने महावतार नरसिंह समोर तगडी स्पर्धा राहणार आहे.
आता येणार महावतार परशुराम
25 जुलै 2025 रोजी टू डी आणि थ्रीडी फॉरमॅटमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 'द लायन किंग' आणि 'कोचादयीया' या चित्रपटांना कमाईत मागे टाकले. आता मेकर्स 'महावतार परशुराम' या पुढील भागावर काम करत आहेत. या भागाची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत असून भारताच्या ॲनिमेशन जगतात महावतार नरसिंह ऑस्कर एन्ट्री अभिमानाचा क्षण मानली जात आहे.























