एक्स्प्लोर

Credit Score : कर्जदारांसाठी गुड न्यूज, आता दर आठवड्याला क्रेडिट स्कोअर अपडेट होणार, आरबीआयच्या नव्या नियमामुळं फायदा होणार

Credit Score: नव्या नियमांनुसार आता क्रेडिट स्कोअर दर सात दिवसांनी अपडेट केला जाणार आहे. हे बदल आरबीआयच्या ड्राफ्ट 'क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्टिंग (प्रथम दुरुस्ती) निर्देश, 2025 नुसार लागू केले जाणार आहेत.

Credit Score नवी दिल्ली : जर तुम्ही क्रेडिट कार्डरचा वापर करत असाल किंवा कर्जाचे ईएमआय भरत असाल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी अपडेट आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) लवकरच एक नियम लागू करणार आहे. त्यानुसार एप्रिल 2026 पासून लोकांना क्रेडिट स्कोअरसाठी फार वाट पाहावी लागणार नाही. तुमचा क्रेडिट स्कोअर दर सात दिवसांनी अपडेट केला जाणार आहे.

Credit Score Update : क्रेडिट स्कोअर दर आठवड्याला अपडेट होणार

नव्या नियमानुसार आता क्रेडिट स्कोअर एका महिन्यात दोन वेळा अपडेट करण्याऐवजी दर सात दिवसानंतर अपडेट केला जाणार आहे. हा बदल आरबीआयच्या ड्राफ्ट क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्टिंग (प्रथम दुरुस्ती ) निर्देश 2025 नुसार लागू केला जाणार आहे. या प्रस्तावानुसार सर्व क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना एका महिन्यात पाचवेळा कर्जदाराची माहिती अपडेट करावी लागेल. यासाठीच्या तारखा दर महि्याच्या 7, 14, 21, 28 आणि महिन्याचा शेवटचा दिवस अशा असतील.

आरबीआयच्या या पावलाचा उद्देश क्रेडिट डेटा रिपोर्टिंग आणि अपडेट करण्याच्या पद्धतीमध्ये मोठा बदल करणं आहे. यामुळं ज्या लोकांचं कर्ज लेटेस्ट क्रेडिट स्कोअरमुळं प्रलंबित आहे त्यांना फायदा होणार आहे.

काय बदल होणार?

बँक किंवा वित्तीय संस्थांना महिन्यात एकदा किंवा दोनवेळा सिबिल, इक्विफॅक्स, एक्सपीरियन किंवा क्रिफ हाई मार्क या सारख्या क्रेडिट ब्यूरोला डेटा पाठवायला लागत असे. आता बँक किंवा एनबीएफसी महिन्यात एकदा क्रेडिट रेकॉर्डची माहिती पाठवतील. मात्र, त्यांना दरम्यानच्या बदलांची माहिती द्यावी लागेल. ज्यामध्ये नव्यानं कर्ज दिलं गेलं असेल, बंद केलेली खाती, कर्ज परतफेड, कर्जदाराची माहिती यातील काही बदल, कर्जाचं वर्गीकरण यातील बदल याची माहिती, म्हणजेच एखाद्यानं क्रेडिट कार्ड बंद केलं, कर्जाची पूर्ण परतफेड केली किंवा रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्डमध्ये सुधारणा केली तर हे बदल काही दिवसात त्याच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये दिसतील.

कर्जदारांना काय फायदा होणार?

ईएमआय किंवा कर्ज परतफेडीनंतर क्रेडिट स्कोअऱमध्ये सुधारणांसाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागणार नाही. क्रेडिट स्कोअरमध्ये ज्या वेगानं सुधारणा होईल त्याच वेगानं कर्ज मंजूर होईल. वेळोवेळी डेटा अपडेट झाल्याचा फायदा क्रेडिट हेल्थवर दिसून येईल. त्यामुळं चांगल्या व्याज दरावर कर्ज मिळण्यास मदत होईल. बँकेजवळ तुमचा लेटेस्ट अपडेटेड डेटा असल्यास नवं कार्ड आणि कर्जासाठी अर्ज करता त्यावेळी कोणतीही अडचण येणार नाही.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
Ravindra Dhangekar : पुण्याचा डान्सबार होऊ देणार नाही, डान्सबारवाल्यांना उमेदवारी देणाऱ्या मुरलीधर मोहोळांनी खुलासा करावा; रवींद्र धंगेकरांचं आव्हान
पुण्याचा डान्सबार होऊ देणार नाही, डान्सबारवाल्यांना उमेदवारी देणाऱ्या मुरलीधर मोहोळांनी खुलासा करावा; रवींद्र धंगेकरांचं आव्हान
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Makar Sankranti Politics : संपला प्रचार कडवा, आता तीळगुळाचा गोडवा Special Report
Ajit Pawar Irrigation Scam : सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची दादांकडून परतफेड Special Report
Raj Thackeray PADU Machine : निवडणुकीत आलं 'पाडू''इंजिन'लागलं धडधडू Special Report
Solapur Mahapalika Election : भाजप उमेदवाराच्या मुलाकडून पैसे वाटप? धक्कादायक व्हिडीओ समोर
Ram Kadam BJP : ठाकरे बंधुंनी मराठी माणसाचा ठेका घेतलाय का? राम कदम यांची टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
Ravindra Dhangekar : पुण्याचा डान्सबार होऊ देणार नाही, डान्सबारवाल्यांना उमेदवारी देणाऱ्या मुरलीधर मोहोळांनी खुलासा करावा; रवींद्र धंगेकरांचं आव्हान
पुण्याचा डान्सबार होऊ देणार नाही, डान्सबारवाल्यांना उमेदवारी देणाऱ्या मुरलीधर मोहोळांनी खुलासा करावा; रवींद्र धंगेकरांचं आव्हान
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
MCA Central Contracts : क्रिकेट विश्वात खळबळ! रोहित, अय्यर अन् जैस्वाल सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून OUT… मुंबई क्रिकेटचा मोठा निर्णय
क्रिकेट विश्वात खळबळ! रोहित, अय्यर अन् जैस्वाल सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून OUT… मुंबई क्रिकेटचा मोठा निर्णय
राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात पैसे वाटप?.शिंदेसेनेचा आरोप, घटनास्थळी पोलीस दाखल 
राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात पैसे वाटप?.शिंदेसेनेचा आरोप, घटनास्थळी पोलीस दाखल 
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
Embed widget