1 नाही 2 नाही तब्बल 3 एकरवर गांजाची लागवड, मका आणि हरभऱ्याच्या आत लागवड, कोट्यावधी रुपयांचा गांजा जप्त
महाराष्ट्र (Maharashtra) आणि मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) सीमेवरील आंबेगाव परिसरात शिरपूर तालुका पोलिसांनी गांजाच्या शेतीवर (Ganja) कारवाई केली आहे. 3 एकर क्षेत्रावर ही गांजाची लागवड केली आहे.
धुळे : महाराष्ट्र (Maharashtra) आणि मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) सीमेवर असलेल्या आंबेगाव परिसरात शिरपूर तालुका पोलिसांनी गांजाच्या शेतीवर (Ganja cultivation) कारवाई केली आहे. सुमारे 3 एकर क्षेत्रावर ही गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त करण्यात येत असून मका आणि हरभरा या पिकांच्या आत ही गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कोट्यावधी रुपयांचा गांजा जप्त
दरम्यान, पोलिसांनी कारवाई करत तीन एकर क्षेत्रावरील कोट्यावधी रुपयांचा गांजा जप्त केला आहे. या गांजाची मोजणी पोलिसांकडून सुरू असून मध्यप्रदेश सीमेपासून अवघ्या 500 मीटर अंतरावर सांगवी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कालपासून या गांजाच्या शेतीवर कारवाई सुरु आहे. आत्तापर्यंत 2 ट्रॅक्टर भरुन गांजा पाठवण्यात आला आहे. मका आणि हरभऱ्याबरोबर ही गांज्याची शेती केला जात होती. आत्तापर्यंत साधारण 8000 किलो गांजा जप्त केला आहे. आणखी 8000 किलो गांजा जप्त करणे बाकी असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. अतिशय आधुनिक पद्धतीनं गांज्याची लागवड करण्यात आली होती. पोलिस स्टेशनपासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावरच ही गांजाची लागवड करण्यात आली होती. ठिबक सिंचनच्या आधारे ही गांजाची लागवड करण्यात आली होती.
काय सांगतो कायदा ?
NDPS म्हणजे NARCOTIC DRUGS AND PSYCHOTROPIC SUBSTANCES ACT, 1985. या कायद्याद्वारे, अंमली पदार्थ आणि हेरॉइन, मॉर्फिन, गांजा, चरस, हॅशिश ऑइल, कोकेन, मेफेड्रोन, एलएसडी, केटामाइन, अॅम्फेटामाइन सारख्या मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या पदार्थाची निर्मिती, वाहतूक, बाळगणे, विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाते. या कायद्याच्या कलम 20 नुसार, गांजाची बेकायदेशीरपणे लागवड केल्यास 10 वर्षांपर्यंत सक्तमजुरी आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. NDPS कायद्यानुसार, भारतात गांजाची लागवड करता येत नसली तरी, राज्य सरकारांना याप्रकरणी कायदे तयार करण्याची अनुमती देण्यात आली आहे. देशभरात केवळ उत्तराखंड या राज्यात गांजा लागवडीसाठी सशर्त परवानगी देण्यात आलीय. तर उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि मणिपूर या राज्यांमध्ये गांजावरील संशोधनासाठी लागवड करण्याची परवानगी देण्यात आलीय. शेतामध्ये यांत्रिकीकरणाचा वापर करून आपण पिकांचं उत्पादन वाढवू शकतो. पण उत्पादन वाढवलं तरी मार्केटमध्ये भावच नाही. दुसरीकडे गांजाला योग्य भाव आहे. त्यामुळे गांजाला पर्यायी पीक म्हणून परवानगी मिळावी अशी मागणी देखील काही शेतकऱ्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Dhule News : बाजरी, ज्वारी पिकाआड गांजाची लागवड! शिरपूरच्या शेतकऱ्याची करामत पाहून पोलीसही चक्रावले; कोट्यवधींचा गांजा जप्त
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

