एक्स्प्लोर

Dr Subhash Bhamre : डॉ. सुभाष भामरेंना भाजप पदाधिकाऱ्यांकडूनच जोरदार विरोध, भ्रष्टाचाराचेही केले आरोप

Dhule Lok Sabha Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघात डॉ. सुभाष भामरे यांना भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडूनच आता विरोध होऊ लागला आहे. पदाधिकाऱ्यांनी डॉ. भामरेंवर गंभीर आरोप केले आहेत.

Dr Subhash Bhamre : धुळे लोकसभा मतदारसंघात (Dhule Lok Sabha Constituency) डॉ. सुभाष भामरे यांना भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडूनच आता विरोध होऊ लागला आहे. सटाण्यात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी बैठक पार पडली असून शेतकरी संघटना या बैठकीला उपस्थित होती. यात डॉ. सुभाष भामरे (Dr Subhash Bhamre) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. 

धुळे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने पुन्हा एकदा डॉ. सुभाष भामरे यांना संधी दिली. मात्र भाजपच्या (BJP) या निर्णयावर भाजपचेच पदाधिकारी नाराज असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी मालेगावमध्ये सुभाष भामरे यांच्या विरोधातील पोस्टर्स झळकले होते. या पाठोपाठ आता त्यांना पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याने मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे. 

भामरेंच्या उमेदवारीवर पक्षात नाराजी 

यावेळी भाजप पदाधिकारी महेंद्र शर्मा म्हणाले की, धुळे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने डॉ. सुभाष भामरेंना पुन्हा तिकीट दिले त्याबाबत मतदारसंघात प्रचंड नाराजी आहे. यावेळी एक चांगला धडाडीचा नेता देणे अपेक्षित होते. अनेकांचे मत आहे की, भामरेंच्या व्यतिरिक्त कुठलाही उमेदवार द्या. त्याला आम्ही मान्य करू मात्र सुभाष भामरेच का? पक्षाने अट्टहास केल्याने भाजपचे अनेक कार्यकर्त्यांनी खंत व्यक्त केली आहे, असे ते म्हणाले. 

भामरेंना उमेदवारी म्हणजे विषप्रयोग

ओबीसी सेलचे अध्यक्ष भाऊसाहेब अहिरे म्हणाले की, पक्षाने या खासदाराला भरभरून दिले. मात्र यांनी सिंचनाचा एकही प्रकल्प केला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी भरपूर निधी दिला. मात्र विकासाच्या नावाने सुभाष भामरेंनी भ्रष्टाचार केला.  माझी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) यांना विनंती आहे की, सुभाष भामरे यांना उमेदवारी देणे म्हणजे विषप्रयोग करणे आहे. पक्षातील अनेक कार्यकर्ते भामरेंच्या उमेदवारीवर नाराज आहेत. त्यामुळे उमेदवारी बदलून द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

भामरेंविरोधात मालेगावला झळकले होते फलक

दरम्यान, धुळे-मालेगाव मतदारसंघाचा उमेदवार आम्हाला बदलून हवा. गेल्या दहा वर्षांपासून विद्यमान खासदार हरवले आहेत, विद्यमान खासदार यांचे धुळे लोकसभा मतदार संघात हिंदुत्वासाठी योगदान काय ? शारीरिक क्षमता नसलेला खासदार आम्हाला नको, अशा आशयाचे फलक काही दिवसांपूर्वी मालेगावमध्ये झळकले होते. थेट भामरे यांच्या उमेदवारीवरच या फलकातून आक्षेप घेण्यात आला होता. 

आणखी वाचा 

Subhash Bhamre : भाजपकडून धुळ्यात डॉ. भामरेंना तिसऱ्यांदा संधी, कोण आहेत सुभाष भामरे? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget