एक्स्प्लोर

राष्ट्रवादीतून भाजपात आले, एका दिवसांत नगरसेवक झाले; महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी चौकार

राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडल्या. काहींनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी केली, तर काहींनी मतदानाआधीच विजय मिळवला आहे.

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांमध्येही भाजपने (BJP) नगरपालिका निवडणुकांप्रमाणेच विजयी सुरुवात केली आहे. मतदानाच्या आधीच भाजपने विजयाचा चौकार ठोकला असून राज्यातील तीन महापालिकांमध्ये मिळून भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांसाठी (Mahapalika election) मतदान होण्याआधीच भारतीय जनता पक्षाने आपलं विजयाचं खातं उघडलं आहे. भाजप उमेदवार रेखा चौधरी आणि आसावरी नवरे बिनविरोध निवडून आल्याची आहेत. रेखा चौधरी या दुसऱ्यादा निवडून आल्या आहेत, तर आसावरी नवरे यांची ही पहिलीच टर्म असल्याची माहिती आहे. दुसरीकडे पनवेल महापालिका आणि विदर्भातील धुळे (dhule) महापालिकेतही भाजपच्या प्रत्येकी एक-एक उमेदवार विजयी झाले आहेत. 

राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडल्या. काहींनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी केली, तर काहींनी मतदानाआधीच विजय मिळवला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपने 2, पनवेलमध्ये 1 आणि आता धुळे मनपात एक उमेदवार विजयी झाला आहे. पनवेल महानगरपालिकेत नितीन पाटील यांची बिनविरोध नगरसेवक पदी निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक- 18 ( ब) मधून हि निवड झाली आहे.

राष्ट्रवादीतून भाजपात, एकाच दिवसांत नगरसेवक

धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज छाननी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष असलेले रणजीत राजे भोसले यांनी काल तडकाफडकी पक्षाचा राजीनामा देत शेवटच्या क्षणी भाजपात प्रवेश केला होता आणि त्यांच्या धर्मपत्नी उज्वला भोसले यांना भाजपाचे तिकीट मिळवले होते. मात्र, आज अर्ज छाननी दरम्यान त्यांच्या विरोधात असलेल्या चारही उमेदवारांचे नामांकन अर्ज बाद झाल्याने त्या बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे, धुळे मनपातील 'त्या' पहिल्याच नगरसेविका म्हणून बिनविरोध निवडून आल्या आहे. विशेष म्हणजे एकाच दिवसात भाजप प्रवेश केला अन् दुसऱ्याच दिवशी नगरसेवक बनल्याचा वेगळाच रेकॉर्ड त्यांच्या नावावर तयार झाला आहे. 

कल्याण डोंबिवलीतील प्रभाग 18 'अ' मधून रेखा राजन चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत एकाही विरोधकाकडून त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नसल्याने रेखा चौधरींचा विजय निश्चित झाला. तर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आसावरी नवरे यांनीही विजय मिळवला आहे. आसावरी केदार नवरे यांनी प्रभाग क्रमांक 26 (क) मधून खुल्या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली आहे.

हेही वाचा

मी भाजपसाठी रात्रंदिवस झटलो; भागवत कराडांनी त्यांच्या जातीच्या माणसाला अन् सावेंनी पीएला तिकीट दिलं; कार्यकर्ता धाय मोकलून रडला

महेश गलांडे हे पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 14 वर्षांपासून कार्यरत असून डिजिटल इंडस्ट्रीतील 12 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. एकेकाळी गिरणगाव आणि सध्या ज्वारीचं कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीसारख्या ग्रामीण भागातून ते येतात, श्री भगवतांची बार्शी, म्हणून देखील हे गाव प्रसिद्ध आहे. ग्रामीण महाराष्ट्राची ओळख, शेती-मातीचे प्रश्न त्यांना अवगत आहेत.

याशिवाय, गिरणी कामगार कुटुंबाची पार्श्वभूमी असल्याने कामगारांचे प्रश्न, मोर्चे, आंदोलन, सामाजिक विषयाची जाण आहे. आपल्या पत्रकारितेच्या कारकि‍र्दीत आत्तापर्यंत 3 लोकसभा आणि 3 विधानसभा निवडणुकांचं कव्हरेज करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यामुळे, ग्रामपंचायत ते संसदपर्यंतच्या निवडणुकांचा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभवाधारित अभ्यास आहे. 

सोलापूर विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून बार्शी ते मुंबई, व्हाया हैदराबाद असा त्यांचा पत्रकारितेतील प्रवास राहिला आहे. फॅक्सद्वारे बातमी पाठवणे ते डिजिटलपर्यंतचा बदल अनुभवला. यापूर्वी लोकमतमध्ये त्यांना लोकमत अचिव्हर्स अवॉर्डनेही सन्मानित केलं आहे. ह्युमन इंटरेस्टिंग स्टोरी, शेतकऱ्यांचे प्रश्न, राजकीय विश्लेषणात्मक बातम्यांची त्यांना चांगली समज आहे.

मीडियातील नाविन्यता, अपडेट्सबद्दल ते जागरुक असतात, AI तंत्रज्ञानाबाबतही ते अपडेट राहतात. सद्यस्थितीत ते एबीपी माझामध्ये डेप्युटी प्रोड्यूसर पदावर कार्यरत असून वेबसाईटवरील बातम्यांसह सोशल मीडियाचंही काम पाहतात.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
Diva Tukaram Mundhe House Robbery : दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
Diva Tukaram Mundhe House Robbery : दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
Suryakumar Yadav : 'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
Embed widget