तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद पेटला; पुजारी मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप , नेमकं प्रकरण काय?
श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ बरखास्त करा अशी मागणी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे .

Tuljapur: गेल्या काही दिवसांपासून तुळजाभवानी मंदिर कोणत्या ना कोणत्या कारणाने सातत्याने चर्चेत आहे . आधी मंदिराच्या गाभाऱ्याच्या शिळांना पडलेले तडे, कळस उतरवण्याच्या वाद, देवीच्या भूजांवरून खल होत असताना देवीच्या पुजारी मंडळामध्ये अंतर्गत वाद सुरू झाला आहे. श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ बरखास्त करा अशी मागणी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे .
नेमके प्रकरण काय?
पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या कार्यकारिणीवर भ्रष्टाचाराच्या आरोप करत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील केली आहे. तर मंडळाची विद्यमान अध्यक्ष विपिन शिंदे यांनी सुपारी घेऊन आरोप केले जात असल्याचा पलटवार केला आहे. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या मनमानी कारभाराला विरोध केल्यामुळेच हे आरोप केले जात असल्याचा प्रतिहल्ला त्यांनी केला. पुजारी मंडळाच्या आजी-माजी अध्यक्षांमध्ये रंगलेला हा वाद यामुळे वातावरण चांगले ढवळून निघालं आहे. माजी अध्यक्षांकडून करण्यात आलेल्या तक्रारीवर धर्मादाय आयुक्त काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे.
नेमके कशामुळे होतायत आरोप ?
तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या मनमानीपणाला विरोध केल्यामुळेच आरोपांची सुपारी घेतल्याचा आरोप होतोय .श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या कार्यकारणीवर भ्रष्टाचाराचे आरोप, फौजदारी गुन्हे दाखल करत कार्यकारणी बरखास्त करण्याची मागणी करण्यात आलीय . पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांची धर्मदाय आयुक्तांकडे तक्रार केलीय . तर सुपारी घेऊन आरोप केले जात लवकरच सूत्रधार कोण हे समोर आणणार, मंडळांचे विद्यमान अध्यक्ष यानी पलटवार केलाय .
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिरातील (Tuljabhavani Temple) मुख्य गाभाऱ्यातील शिखराबाबत केंद्रीय पुरातत्व विभागाने गाभाऱ्यातील शिळांना गेलेले तडे आणि सद्यस्थितीच्या केलेल्या पाहणीचा अहवाल राज्य पुरातत्त्व विभागाकडे सोपवला आहे. याच अनुषंगाने लवकरात लवकर मुंबईत बैठक घेऊन तोडगा काढण्यासाठी राज्य पुरातत्त्व विभागाला जिल्हा प्रशासनाने साद घातली आहे. आई तुळजाभवानी देवी मंदिराच्या मुख्य शिखराबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र लवकरच पुरातत्व विभागाच्या बैठकीत सकारात्मक निर्णयाची जिल्हा प्रशासनाला अपेक्षा आहे.























