एक्स्प्लोर

Manoj Jarange : जरांगे पाटलांच्या उशीरापर्यंत सभा, धाराशिव, साताऱ्यात पोलिसांची कारवाई; आयोजकांवर गुन्हे दाखल

रात्री उशारापर्यंत सभा सुरु ठेवल्यामुळे धाराशिव आणि सातारा जिल्ह्यात मनोज जरांगे पाटलांच्या सभेचं आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई :  रात्री 10 नंतर सभा आयोजित केल्याने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या सभांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. धाराशिवमध्ये (Dharashiv) पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.  दरम्यान उशीरा सभा घेतल्याने आणि ध्वनी मर्यादेचं उल्लंघन केल्याने गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आलीये. धाराशिवप्रमाणे सातारा जिल्ह्यातही जरांगे पाटलांच्या सभांच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.  जिल्हाधिकारी तसेच  जिल्हा दंडाधिकारी धाराशिव यांनी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश दिले होते. तरीही धाराशिवमधील वाशीत जरांगे पाटलांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रवीण आप्पासाहेब देशमुख आणि संदीपान नामदेवराव कोकाटे अशी या आयोजकांची नावे आहेत. 

धाराशिवमध्ये जरांगे पाटलांच्या सभेच्या दिवशी रात्री 22.00 ते 23.05 पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले होते. पण याचा कालावधीमध्ये धाराशिवमधील वा. सु. हायस्कुल कन्या प्राथमिक शाहा ईट येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं. दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सभा चालू ठेवून आदेशाचे उल्लघंन करण्यात आल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आलीये. 

साताऱ्यातही गुन्हे दाखल 

साताऱ्यात जरांगे पाटील यांच्या दोन सभांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दोन्ही गुन्हे उशीरापर्यंत सभा घेतल्यामुळे आणि ध्वनी मर्यादेचं उल्लंघन केल्यामुळे दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे. साताऱ्यात जरांगे पाटलांची पहिली सभा ही खटाव तालुक्यातील मायणी येथे पार पडली होती. त्यानंतर मराठानगर, कराड, सातारा, मेढा, वाई, महाबळेश्वर आणि प्रतापगड येथे सभांचं आयोजन करण्यात आलं होते. यामधील मायणी आणि कराड येथे उशीरा सभा पार पडल्या. या ठिकाणच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 

रात्री उशीरपर्यंत जरांगे पाटलांच्या सभांचं आयोजन

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मनोज जरांगे यांचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागामध्ये मनोज जरांगे यांच्या सभा पार पडतायत. यातील अनेक सभा रात्री उशारीपर्यंत सुरु होत्या. धाराशिवमधील वाशी आणि परंडा तसेच सोलापुरातील करमाळा येथील वांगी तालुक्यातील सभा या रात्री उशीरापर्यंत होत्या. करमाळ्यातील सभा ही तर संध्याकाळी सात वाजता होणार होती. पण या सभेला पोहचण्यासाठी जरांगे पाटलांना पहाटेचे चार वाजले. तरीही थंडीत कुडकुडत मोठ्या संख्याने मराठा बांधव सभेसाठी थांबले होते.

मनोज जरांगेंचा महाराष्ट्र दौरा 

मराठा आरक्षणासाठी 24 नोव्हेंबरपर्यंत मनोज जरांगे यांनी सरकारला अल्टिमेटम दिलं आहे. परंतु त्यानंतर जर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर सोडणार नाही, असा इशारा देखील जरांगे पाटील त्यांच्य प्रत्येक सभेतून देत असतात. त्याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी त्यांच्या तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली. त्यासाठी राज्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यात मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी सभा घेत आहेत. 

दरम्यान मनोज जरांगे यांची 19 नोव्हेंबर रोजी रायगडमधील सभा उशारीपर्यंत घेतली. देहूमधील सभा तर त्यांनी रात्री पावणे चार वाजता घेतली. तसेच आळंदीमधील सभा पहाटे पावणे चार वाजता संपली. पण अद्याप या ठिकाणी जरांगे पाटलांच्या सभांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या ठिकाणी देखील मनोज जरांगे यांच्या सभांचं आयोजन करणाऱ्या आयोजकांवर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

हेही वाचा : 

Thane Traffic : मनोज जरांगेंची तोफ ठाण्यात धडाडणार, पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल, शहरात 'या' ठिकाणी असेल प्रवेश बंद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Working HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget