एक्स्प्लोर

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात महिला मृत्यूमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात गेल्या काही दिवसात बिबट्याचा वावर पहायला मिळाला.

धाराशिव/चंद्रपूर : विदर्भातील चंद्रपूर (Chandrpur) जिल्ह्यातील अभयारण्यात वाघांचा वावर असतो, येथील व्याघ्र दर्शनासाठी देशभरातून पर्यटक येतात. मात्र, कधी-कधी या वाघांकडून स्थानिक रहिवाशांच्या जीवावर बेतल्याच्या घटनाही घडल्या आहेत. आता, पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली असून, वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील सावली तालुक्यातील निलसनी-पेडगाव परिसरातील जंगलात ही दुर्दैवी घटना घडली. रेखाबाई मारोती येरमलवार (55) असे मृत महिलेचे नाव असून झाडणी (केरसुणी) साठी लागणारं गवत आणण्यासाठी त्या जंगलात गेल्या होत्या. त्यांच्यासोबतच्या महिलांनी महिलेवर वाघाने हल्ला केल्याची माहिती गावात दिली. त्यानंतर, वनपथक घटनास्थळी पोहोचले असून ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला आहे. दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात बिबट्या (Leopard) आढळून आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात महिला मृत्यूमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात गेल्या काही दिवसात बिबट्याचा वावर पहायला मिळाला. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण पसरलं आहे. बिबट्याने शेतातील लहान मोठी 9 जनावरे फस्त केल्याने ग्रामस्थांची भीती अधिकच वाढली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून ट्रॅप लावण्यात आला, मात्र बिबट्या अद्याप पिंजऱ्यात सापडला नाही. तालुक्यातील कपिलापुरी,सोनारी, रूई, खामसगाव,सोनगिरी,कारंजा, भोंजा, वागेगव्हाण, लोणी व खासगाव या दहा गावांमध्ये बिबट्या आढळून आल्याच सांगितलं जात आहे. 

वन विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी जागेवर जाऊन पाहणी केली असता काही पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याचे दिसून आले. खबरदारीचा उपाय म्हणून  गावात वन कर्मचारी तैनात केले असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, खासापुरी येथील एका महीलेला हा बिबट्या दिसला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे, वन्य जीवांचा अशाप्रकारे मानवी वस्तीत वावर झाल्याने नागरिकांमध्ये भीती असून वन विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

हेही वाचा

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; तारीख 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता, ठिकाणही निश्चित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget