Dharashiv Tiger Rescue : धाराशिवमधला वाघ अद्याप गवसेना! ताडोबातील रॅपिड रेस्क्यू टीम परतली; आता डॉग स्कॉडची मदत
Dharashiv News धाराशिव जंगलात असलेल्या वाघाचा आठ दिवसानंतरही शोध (Tiger Rescue) लागला नाही. त्यामुळे ताडोबातील टीम परतली असून आता पुण्यातील रेस्क्यू टीमकडून वाघाचा शोध सुरू आहे.
Dharashiv Tiger Rescue Operation : धाराशिव जंगलात असलेल्या वाघाचा आठ दिवसानंतरही शोध (Tiger Rescue) लागला नाही. त्यामुळे ताडोबातील टीम परतली असून आता पुण्यातील रेस्क्यू टीमकडून वाघाचा शोध सुरू आहे. आठ जणांच्या या टीम मध्ये शार्प शूटर, डॉक्टरचाही समावेश आहे. त्यासोबतच वाघाच्या शोधासाठी वाइल्ड लाइफ डिटेक्शन डॉग स्कॉडलाही पाचारण करण्यात आले आहे. वाघांच्या ठशावरून हा शोध घेतला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
ताडोबातील रॅपिड रेस्क्यू टीम परतली, आता डॉग स्कॉडची मदत
धाराशिवमध्ये गेल्या महिनाभरापासून बस्तान बसवलेल्या वाघाला पकडून सह्याद्रीत सोडण्याचे आदेश नुकतेच मुख्य वनसंरक्षकांकंडण देण्यात आले होते. त्यानंतर वाघ आणि मानवी संघर्ष टाळण्यासाठी धाराशिव, बार्शी भागात फिरणाऱ्या वाघाच्या रेस्क्यूला परवानगी देण्यात आली होती. दरम्यान, या वाघाला पकडण्यासाठी ताडोबा प्रकल्पातील दहा जणांची रॅपिड रेस्क्यू टीम धाराशिवमध्ये दाखल झाली होती. तर त्यांच्या मदतीसाठी सोलापूर आणि धाराशिव वन विभागाचे कर्मचारी देखील दाखल झाले होते. म्हणजे जवळपास 45 जणांकडून वाघाचा शोध सुरू होता.
मात्र 20 किलोमीटरची पायपीट करूनही वाघाचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. वाघाने शिकारीचा पॅटर्न बदलल्याने शोधात अडचणी येत होत्या. मात्र आता येडशी अभयारण्य जवळील ट्रॅप कॅमेरात वाघाची छबी पुन्हा कैद झाली. परंतु अद्याप वाघाचा शोध न लागल्याने वाघाच्या शोधासाठी आलेली ताडोबातील रॅपिड रेस्क्यू टीम परतली आहे. परिणामी आता पुण्यातील रेस्क्यू टीमकडून वाघाचा शोध सुरू करण्यात येणार आहे.
एकाच वेळी पाच मोरांचा मृत्यू; परिसरात खळबळ
नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात खैरी येथे एका शेतात एकाच वेळी पाच मोरांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यातील अनुसूची एकमध्ये असणाऱ्या राष्ट्रीय पक्षी मोरांच्या या मृत्यूने खळबळ उडाली आहे. एच१ एन१ या विषाणमुळे सध्या अनेक ठिकाणी पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. यासंदर्भात शासनाकडून ‘अलर्ट’ देण्यात आला आहे. अशातच पाच मोरांच्या मृत्यूची घटना समोर आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
शनिवारी काही तरुणांना शेतात मोर मृतावस्थेत पडून असल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती वनविभागाला दिल्यानंतर विभागाचे कर्मचारी त्याठिकाणी आले. वन विभागाच्या चमूने घटनास्थळी पोहोचून त्या ठिकाणीच मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन करत अंत्यसंस्कार केले. मात्र या पक्ष्यांचा मृत्यू शेतावर फवारणी करण्यात आलेल्या कीटकनाशकांमुळे ही होऊ शकतो, अशी शक्यता ही वर्तवण्यात येत.
दरम्यान, मृत पक्षांच्या अवयवाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील न्यायवैद्याक प्रयोगशाळेत तसेच भोपाळ येथील संस्थेला तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या