एक्स्प्लोर

Bhandara Tiger Photo Session: वाघासोबत फोटोसेशन प्रकरण भोवलं; वनविभाग ॲक्शन मोडवर, नागरिकांवर कारवाईचा बडगा

Bhandara Tiger News : वाघाला ग्रामस्थांनी अक्षरश: घेराव घालून त्याच्यासोबत फोटोसेशन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. या संदर्भात एबीपी माझा नं बातमी दाखवताचं आता वन विभाग ॲक्शन मोडवर आलं आहे.

Bhandara Tiger Photo Session: BT-10 या वाघिणीचा 19 वर्षीय बछडा आईपासून दुरावलेला असून हा वाघ स्वतःचं अस्तित्व टिकविण्यासाठी नवीन जंगलाच्या शोधासाठी भटकंती करीत आहे. अशात अड्याळ वनपरिक्षेत्रातील कोतूर्ली गावालगत वाघानं शिकार केल्यानंतर सुस्तावलेला वाघ झुडपात बसला होता. यावेळी शेकडोंच्या संख्येत ग्रामस्थांनी त्याला अक्षरश: घेराव घालून त्याच्यासोबत फोटोसेशन केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. या संदर्भात एबीपी माझा नं बातमी दाखवताचं आता वन विभाग ॲक्शन मोडवर आलं आहे.

वाघासोबत स्वतःच्याही जीवाला नागरिकांच्या या उपद्रव्यमूल्यांमुळे धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी वाघाला त्रास दिल्यास त्यांच्यावर वन अधिनियमानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा वन विभागानं दिला आहे. जनावरांची झालेली शिकार, वाघ आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी या 19 महिन्याच्या वाघाला जेरबंद करण्याच्या दृष्टीनं एक कमिटी गठीत करण्यात आली असून त्याला जेरबंद करून प्राणी संग्रहालयात सोडण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडं सादर करण्यात येणार आहे. नागरिकांच्या उपद्रव्य मूल्यामुळेचं आता जंगलात मुक्तसंचार करण्याऐवजी 19 महिन्याच्या वाघाच्या बछड्याला जेरबंद व्हावं लागत असल्यानं वन्यप्रेणींमध्ये नाराजी बघायला मिळतं आहे. तरवाघा त्रास देणाऱ्या नागरिकांवर वन्यजीव अधिनियमानुसार कडक कारवाई होणार असल्याची माहिती  भंडारा उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी दिली आहे.

अगदी दहा फूट अंतरावरून वाघाला डीवचण्याचा प्रयत्न 

भंडारा वन विभागाच्या अड्याळ वनपरिक्षेत्रातील कोतुर्ली गावाजवळ मागील काही दिवसांपासून वाघाचं वास्तव्य आहे. हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीचा असून आता हा समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाल्यानं समोर आला आहे. घटनेच्या दिवशी या वाघानं दोन पाळीव जनावरांची शिकार करून त्यांच्यावर ताव मारल्यानंतर तो एका झुडुपात दडून बसला होता. दरम्यान, याची माहिती मिळताच बघता बघता शेकडो ग्रामस्थ वाघ असलेल्या परिसरात पोहोचलेत. वाघ निस्तेज असल्याचं बघून अनेकांनी अगदी दहा फूट अंतरावरून त्याला डीवचण्याचा प्रकार केला.

वेगाव-नागझिऱ्यातील NT-2 वाघिणीने तीन छाव्यांना जन्म

नवेगाव-नागझिऱ्यात गेल्या काळात अस्तित्वासाठी झालेला वाघांचा थरार गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील नागरिकांनी अनुभवला असताना आता वन्यजीव प्रेमींसाठी नागझिऱ्यातून खुशखबर आली आहे. गेल्या दिड वर्षांपूर्वी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलेल्या NT-2 वाघिणीने तीन छाव्यांना जन्म दिले असून आपल्या आईसह रानगव्याच्या शिकारीनंतरचा फोटो ट्रॅप कॅमेर्‍यात कैद झाला आहे. त्यामुळे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातर्फे व्याघ्र संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना महत्त्वपूर्ण यश आले आहे. 

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प (NNTR), गोंदिया येथे व्याघ्र संवर्धनासाठी महाराष्ट्र वन विभागाने राबविलेल्या वाघाचे संवर्धन स्थानांतरण, (Tiger Conservation Translocation) उपक्रमामध्ये आतापर्यंत एकूण 3 वाघीन नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थानांतरण करण्यात आलेले आहे. त्यात पहिल्या टप्प्यामध्ये NT-1 व NT-2 ह्या वाघीनीला 20 मे 2023 रोजी तर दुसऱ्या टप्प्यामध्ये NT-3 या वाघीनीला 11 एप्रिल 2024 ला नागझिरा वन्यजीव अभयारण्य येथे निसर्गमुक्त करण्यात आले होते. त्यामध्ये NT-2 वाघिणीने नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये सहजपणे आपली जागा निर्माण केली आणि आता सद्यास्थितीमध्ये ट्रॅप कॅमेराद्वारा NT-2 वाघिणीच्या हालचालीवर संनियंत्रण करण्यात येत आहे. सदर ट्रॅप कॅमेरामध्ये NT-2 वाघिणीचे प्रथमतःच तिच्या 3 छाव्यांसोबत रानगव्याच्या शिकारीवर फोटो प्राप्त झाला आहे. 

सद्या निसर्गमुक्त केलेल्या 3 वाघीनीपैकी 2 वाघीन ने नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात (गाभा व बफर) आपला अधिवास निर्माण केला आहे. तेव्हा NT-2 वाघीनीच्या पिलांच्या जन्मामुळे प्रकल्पाच्या उद्दिष्टांना नवे यश व दिशा प्राप्त झाली आहे. NT-2 वाघिणीच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी VHF/GPS कॉलर आणि कॅमेरा ट्रॅप यासारखी आधुनिक साधने वापरण्यात आली होती. ज्यामध्ये Command & Control Room चा महत्वाचा वाटा आहे. तसेच या यशामध्ये अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य नागपूर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव पुर्व) नागपूर यांचे मार्गदर्शनात तसेच नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदियाचे क्षेत्रसंचालक जयरामे गौडा आर. (भावसे) , साकोलीचे उपसंचालक पवन जेफ (भावसे), उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई (भावसे), विभागीय वन अधिकारी अतुल देवकर, सहायक वनसंरक्षक सचिन डोंगरवार, व्ही. के. भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी सपना टेंभरे, दिलीप कौशीक व वनविभागातील इतर कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

हे ही वाचा  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Embed widget