Devendra Fadnavis: निकालानंतर काँग्रेसचे नाव पुसलं जाईल; पराभवाचा भीतीनेच राहुल गांधींकडून कव्हर फायरिंगचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis on Rahul Gandhi: दिल्लीत पराभव होणार असल्यामुळे त्याचं कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न राहुल गांधी आरोप करून करत असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

Nagpur News: निवडणुकांची आकडेवारी इलेक्शन कमिशनने दिलेली आहे. त्यात किती मतदार वाढले, कुठे वाढले हे सगळं त्यात सांगितलेल आहे. मात्र दिल्लीत पराभव होणार असल्यामुळे त्याचं कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न राहुल गांधी (Rahul Gandhi) आरोप करून करत असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राहुल गांधींनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते पुढे म्हणाले की, जोपर्यंत ते आत्मचिंतन करणार नाही, खोट्या मनाची समजूत करून घेतील, तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या संदर्भात इलेक्शन कमिशनने याचे उत्तर दिल्यामुळे या बाबत उत्तर देण्याची गरज नाही. 8 तारखेला येणाऱ्या दिल्लीच्या निकालानंतर त्यांच्या पार्टीचं नाव संपणार असल्यामुळे राहुल गांधी त्यादिवशी काय बोलणार, त्याची प्रॅक्टिस ते आतापासून करत असल्याचा टोला ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadnavis on Rahul Gandhi) लगावला आहे. तर राहुल गांधी यांनी आत्मचिंतन करावं, असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला आहे. ते नागपूर येथे बोलत होते.
....तो उसपर हंसा नहीं करते! - देवेंद्र फडणवीस
जब एक ही चुटकुला बार-बार सुनाया जाए तो उसपर हंसा नहीं करते!#RahulGandhi @RahulGandhi
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 7, 2025
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक मुद्यांवर भाष्य केलंय. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीआधी तब्बल 39 लाख मतदार कसे वाढले? असा सवाल त्यांनी यावेळी केलाय. तर पंतप्रधानांनी निवडणूक आयुक्त निवडण्याची पद्धत बदलली. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यात मतदार का वाढले? 5 वर्षात 44 लाख असताना पाच महिन्यात 39 लाख कसे आले? असे अनेक सवाल करत राहूल गांधी यांनी टीकेची झोड उठवत आरोप केले आहेत. दरम्यान याच मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी मिश्किल शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी एक्सवर पोस्ट करत भाष्य केलं आहे. त्यात ते म्हणले की, जब एक ही चुटकुला बार-बार सुनाया जाए तो उसपर हंसा नहीं करते! असे म्हणत त्यांनी राहुल गांधींनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis: दावोसमधील ऐकुण MOUपैकी पाच लाख कोटींची गुंतवणूक एकट्या विदर्भासाठी; एडवांटेज विदर्भ कार्यक्रमातून देवेंद्र फडणविसांची मोठी घोषणा
- Rahul Gandhi : महाराष्ट्रात 5 वर्षात 44 लाख मतदार वाढले, मग फक्त पाच महिन्यात 39 लाख कसे आले? लोकसभा निवडणुकीनंतर इतके मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा डेटा देत गंभीर आरोप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
