Devendra Fadnavis: दावोसमधील ऐकुण MOUपैकी पाच लाख कोटींची गुंतवणूक एकट्या विदर्भासाठी; एडवांटेज विदर्भ कार्यक्रमातून देवेंद्र फडणविसांची मोठी घोषणा
Devendra Fadnavis : दावोसमध्ये जे 15 लाख 70 हजार कोटींचे एमओयु (MOU) आम्ही केले. त्यापैकी पाच लाख कोटींचे एमओयु(MOU) एकट्या विदर्भासाठी केले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Nagpur: दावोसमध्ये जे 15 लाख 70 हजार कोटींचे एमओयु (MOU) आम्ही केले. त्यापैकी पाच लाख कोटींचे एमओयु(MOU) विदर्भासाठी केले आहे. अनेक वेळेला लोक म्हणतात एमओयु प्रत्यक्ष गुंतवणुकीत परावर्तित होत नाही. देशात एमओयुचे प्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये परावर्तित होण्याचे दर कमी असले, तरी महाराष्ट्रात 80 ते 90% एमओयु प्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये परावर्तित होतात. मागील वर्षीच्या 274 पैकी एमओयु मधून फक्त पाच एमओयु सोडून इतर सर्वांचे काम वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आहे. किंबहुना आम्ही फक्त कागदोपत्री एमओयु करत नाही, तर त्याला प्रत्यक्षातही आणतो. असे विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे.
नागपुरात आज पासून 'खासदार औद्योगिक महोत्सव' अंतर्गत तीन दिवसीय 'एडवांटेज विदर्भ' या बिझनेस कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा तीन दिवसीय एडवांटेज विदर्भ या बिझनेस कॉनक्लेव्हचे उद्घाटन होत आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत आहे.
लवकरच गडचिरोलीमध्ये नवं विमानतळ
गडचिरोलीमध्ये लोह खनिज असताना गडचिरोलीचा वापर एखाद्या कॉलोनी सारखा होत होता. म्हणजेच तिथले लोह खनिज बाहेर नेऊन बाहेर कारखाने लावण्यासाठी होऊ नये यासाठी आपले प्रयत्न होते आणि त्याला आता यश येऊन गडचिरोलीमध्ये पहिला स्टील प्लांट सुरू झाला आहे. किंबहुना त्याच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन पण झाले आहे. लवकरच गडचिरोली मध्ये विमानतळ उभारण्याचे काम ही सुरू केले जाईल. अशी माहिती ही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली आहे.
चीननंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची फ्लाईंग अकॅडमी अमरावती
चीन नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची फ्लाईंग अकॅडमी अमरावती मध्ये सुरू होईल. 25, 000 वैमानिकांना तिथे प्रशिक्षण दिले जाईल. या संबंधित एअर इंडिया सोबत करार झाले आहे. तसेच नवी मुंबईचे विमानतळ एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यात किंवा एप्रिल अखेर सुरू करू. तर वाढवण पोर्ट जगातील सर्वात मोठा पोर्ट आपण तयार करत आहोत. हा पोर्ट जेएनपीटी पेक्षा तीन पट मोठा असेल. वाढवण पोर्टची कनेक्टिव्हिटी नाशिक सोबत राहील. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या























