(Source: ECI | ABP NEWS)
Devendra Fadnavis : घरकुलसाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येकाला घर, वीजदर 26 टक्क्यांनी कमी होणार; वर्ध्यातील भाजपच्या मंथन मेळ्याव्यातून मुखमंत्री फडणवीसांचा घोषणांचा पाऊस
Devendra Fadnavis: 2018 पर्यंत ज्यांनी ज्यांनी सरकारकडून विविध योजनेमध्ये घरकुलसाठी नोंदणी केली असेल त्याला घरे मिळणार, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.

Devendra Fadnavis : तुम्हाला शब्द देतो की हे सरकार जेव्हा 5 वर्ष पूर्ण करेल, तेव्हा महाराष्ट्राचा संपूर्ण ट्रान्सफॉर्मेशन झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्र उत्तम प्रदेश आहेच. मात्र, दिन दलित, मागास सर्वांचा विकास तुम्ही आगामी काळात पाहणार. त्यासाठी सरकारने विशेष नियोजन केले आहे. राज्यात विकासकामे सर्व ऑटो पायलट मोडमध्ये चाललं पाहिजे अशी स्थिती आपल्याला निर्माण करायची आहे. अपूर्ण प्रकल्प मग ते सिंचनचे असतील किंवा विकासाचे असतील ते पूर्ण करण्यावर आपला प्रथम भर आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रात एकाच वर्षात 30 लाख घरे मंजूर केली आहे. तर 2018 पर्यंत ज्यांनी ज्यांनी सरकारकडून विविध योजनेमध्ये घरकुलसाठी नोंदणी केली असेल, मग तो कुठल्याही जातीचा का असू नये त्याला घरे मिळणार आहे.अशी मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.
बेघरमुक्त महाराष्ट्रकडे आपण वाटचाल करत आहोत. केंद्राच्या मंजुरीने आपण नवीन सर्वेक्षण सुरू केले आहे. सोबतच 2025 ते 2030 पर्यंत वीजदर घोषित करणारे आपले पहिले सरकार आहे. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते वर्ध्यात होत असलेल्या भाजपच्या विशेष विभागीय मंथन बैठकीत बोलता होते.
विदर्भाचा दुष्काळ 100% भूतकाळ होणार- देवेंद्र फडणवीस
विदर्भात आपण वैनगंगा-नळगंगा जोड प्रकल्प हाती घेतला आहे. विदर्भाचे चित्र हा प्रकल्प बदलेल. येत्या काळात दहा हजार एकर जागा सिंचनाखाली येईल. परिणामी विदर्भाचा दुष्काळ 100% भूतकाळ होणार, अशी व्यवस्था आपण विदर्भात निर्माण करू. सोबतच नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रात राबवली. आता दुसऱ्या टप्प्यात ती संपूर्ण विदर्भात राबवून त्यासाठी 5000 कोटींची गुंतवणूक आपण करणार आहोत. अशी मोठी घोषणाहि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
70 टक्के ग्राहकांचे वीजबिल 26 टक्क्यांनी कमी होणार- देवेंद्र फडणवीस
ग्रामीण भागात शंभर टक्के पांदण रस्ते तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. गेल्या 20 वर्षात बघितलं दरवर्षी वीजदर 20 टक्क्यांनी वाढतात. पण आता मात्र आपण नवीन दर एमईआरसी दर मंजूर करुन घेतले, दरवर्षी वीजेचे दर आपण कमी करणार आहोत. वीज वापरणाऱ्या 70 टक्के ग्राहकांचे वीजबिल 26 टक्क्यांनी कमी होणार. डिसेंबर 2026 नंतर आपल्या शेतकऱ्यांना विजेसाठी रात्री शेतावर जावं लागणार नाही. सोबतच100 युनिट पर्यंत वीज वापरतात त्यांच्या 2024च्या वीज बिलेच्या तुलनेत 2030 पर्यंत विजेचे बिल दर वर्षी कमी होत जाणार आहे. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विरोधक हे आपल्याशी विकासात स्पर्धाच करु शकत नाहीत
आपले विरोधक हे आपल्याशी विकासात स्पर्धाच करु शकत नाहीत. मोदीजींनी विकासाची दिशा आणि विकासाचा जो वेग आपल्याला दिलेला आहे, त्याच्याशी त्यांना स्पर्धा करता येत नाही. त्यामुळे ते चुकीची माहिती पसरवण्याची मोहीम चालवत आहेत. ते रोज एक वेगळा नरेटिव्ह देण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळी विकासाशी स्पर्धा करता येत नाही, त्यावेळी विकासावर चर्चा होऊनच द्यायची नाही. विकासावर चर्चा झाली तर लोक त्यांना प्रश्न विचारतात, तुम्ही सत्तेत असताना काय केले. विरोधकांकडे दाखवण्यासारखी एकही गोष्ट नाही. त्यामुळे ते दररोज नवनवे नरेटिव्ह तयार करतात.
महत्वाच्या बातम्या:
























