एक्स्प्लोर

Devendra Fadnavis PM Modi Meeting: अतिवृष्टीच्या तडाख्यानं बळीराजा हवालदिल, मुख्यमंत्र्यांची दिल्लीत पंतप्रधानांशी तासभर चर्चा; मोठा निर्णय होणार ?

Devendra Fadnavis Meet PM Modi : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (26 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची भेट घेतलीय.

नवी दिल्ली: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (26 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची भेट घेतली. या महत्वपूर्ण बैठकीत राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) मधून भरीव मदत करण्याची विनंती केली. नवी दिल्लीत पंतप्रधानांसोबत तासभर चाललेल्या बैठकीनंतर (Devendra Fadnavis Meet PM Modi) पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि, “मी महाराष्ट्रातील पूर परिस्थितीची सविस्तर माहिती देणारे निवेदन पंतप्रधानांना सादर केले आणि मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची माहिती दिली. बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एनडीआरएफ (NDRF) मार्फत भरीव मदतीची विनंती केली.” ते पुढे म्हणाले कि, “पंतप्रधान खूप सकारात्मक होते आणि राज्याकडून प्रस्ताव आल्यानंतर केंद्र सरकार कारवाई करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांनी महाराष्ट्र सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.” असेही मुखमंत्री फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis on loan waiver)

पंतप्रधानांशी तासभर चर्चा; मोठा निर्णय होणार ?(Devendra Fadnavis Meet PM Modi )

गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पूरग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफ मदतीची विनंती करणारे निवेदन सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची हि बैठक झाली. पूरग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफ मदतीची विनंती करणारे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधानांपुढे सादर केले. तर मुख्यमंत्र्यांनी भेटीदरम्यान राज्यात 3 संरक्षण कॉरिडॉरला मान्यता देण्याची मागणी पंतप्रधानांकडे केली. याशिवाय, गडचिरोलीतील पोलाद उत्पादनासाठी सवलती, दहिसर येथील भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या जागेचे हस्तांतरण तसेच, उद्योग सुलभतेसाठी (इज ऑफ डुइंग बिझनेस) राज्य सरकारकडून केले जात असलेले उपाय आदी विषयांवर देखील पंतप्रधान मोदींशी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

"मी महाराष्ट्रात संरक्षण उत्पादन परिसंस्था निर्माण करण्यावर भर दिला, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, रोजगार निर्माण होईल आणि संरक्षण उत्पादन बळकट होईल. हा कॉरिडॉर तीन क्षेत्रांमध्ये विकसित केला जाऊ शकतो: पुणे, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर; नाशिक आणि धुळे; आणि नागपूर, वर्धा आणि अमरावती," असेही देवेंद्र फडणवीस yaveli म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीला देशातील नवीन स्टील सिटी म्हणून विकसित करण्याची राज्य सरकारची योजना देखील सादर केली, ज्यामुळे ग्रीन स्टीलच्या उत्पादनाला चालना मिळेल. पंतप्रधानांनी या प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद दिला असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर (Prime Minister on visit to Maharashtra)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्‍यांनी दिल्ली दौऱ्यातून दिली.राज्यातील नुकसानीसंदर्भात सध्या माहिती घेण्याचं काम सुरू आहे, आढावा सुरू आहे. एकदा हे काम पूर्ण झाल्यानंतरच एकूण किती नुकसान झालंय हे सांगता येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget