NMC News : सोमवारी शहरातील 4513 घरांचे सर्वेक्षण, डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना
Nagpur : सोमवारी मनपाच्या झोननिहाय पथकाद्वारे 4513 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी 138 घरांमध्ये आणि 146 कंटेनर्स व 68 कूलर्समध्ये डेंग्यू अळी आढळून आली. याशिवाय 07 ताप असलेले रुग्ण आढळून आले.

नागपूर : डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे (NMC) झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू असून सोमवारी 11 जुलै रोजी शहरातील दहाही झोन मध्ये 4513 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य चमूद्वारे (Health Team) डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरामध्ये सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. धरमपेठ झोनमध्ये डेंग्यूचा एक संशयित रुग्ण आढळला आहे. ही माहिती हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ.जास्मीन मुलाणी यांनी दिली.
सोमवारी झोननिहाय पथकाद्वारे 4513 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी 138 घरांमध्ये आणि 146 कंटेनर्स व 68 कूलर्समध्ये डेंग्यू (Dangue) अळी आढळून आली. याशिवाय 07 ताप असलेले रुग्ण आढळून आले. मनपाच्या चमूद्वारे 81 कुलर्स रिकामी करण्यात आले. 404 कुलर्समध्ये 1 टक्का टेमिफॉस सोल्यूशन तर 1044 कुलर्समध्ये 2 टक्के डिफ्लूबेंझ्युरोम गोळ्या टाकण्यात आले. तसेच 59 कुलर्समध्ये गप्पी मासे टाकण्यात आले. डेंग्यू प्रतिबंधात्मक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरामध्ये किंवा परिसरात कुठेही डासोत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. डेंग्यू संबंधी कुठलीही सौम्य लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
Mission Admission : शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची चिंता
नागरी समस्या निवारण केंद्रांद्वारे 465 तक्रारींचे निराकरण
नागपूर : नागरिकांच्या मुलभूत तक्रारींच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे झोनस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कोरोना नियंत्रण कक्षांना ‘नागरी समस्या निवारण केंद्र’ म्हणून कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून सोमवारी 11 जुलै पर्यंत झोन स्तरावर नागरी समस्या निवारण केंद्रांमध्ये 667 तक्रारी प्राप्त झालेल्या असून आतापर्यंत दहाही झोनमधील 465 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
Amravati : उमेश कोल्हेच्या हत्येचा मास्टरमाईंड राणांचा कार्यकर्ता, यशोमती ठाकूर यांचा आरोप, तर आ. राणा म्हणाले...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
