एक्स्प्लोर

बॉलिवूड अभिनेत्री झायरा वासिमचा विमानात विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी दोषी, तीन वर्षांची शिक्षा  

दंगल गर्ल झायरा वासिमच्या विमानातील विनयभंग प्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने 3 वर्ष आणि 25 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीला लगचेच न्यायालयाकडून जामीनही मिळाला आहे.

मुंबई : बॉलिवूडची अल्पवयीन अभिनेत्री झायरा वासिमसोबत झालेल्या विनयभंग प्रकरणी विकास सचदेव या आरोपीला मुंबईतील दिंडोशी कोर्टानं पोक्सो अंतर्गत दोषी ठरवलं आहे. न्यायाधीश ए.डी. देव यांनी विकासला दोषी ठरवत 3 वर्षांची शिक्षा आणि 25 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. शिक्षेच्या सुनावणीनंतर आरोपी विकास सचदेवला 25 हजारांचा जामीन मंजूर, तसेच तीन वर्षांच्या शिक्षेलाही कोर्टाकडून स्थगिती दिली आहे.

विकास सचदेव हा व्यावसायिक असून तो एका नावाजलेल्या मनोरंजन कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होता. 9 डिसेंबर 2017 च्या रात्री दिल्लीहून मुंबईत येत असताना विस्तारा एअरलाईन्सच्या विमानात विकासनं आपला विनयभंग केल्याचा आरोप या अल्पवयीन बॉलिवूड अभिनेत्रीनं केला होता. मात्र आरोपीच्या पत्नी दिव्या सचदेव यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत केवळ चर्चेत राहण्यासाठी अभिनेत्रीनं हे आरोप करत केल्याचा दावा केला आहे.

विकास सचदेव यांच्या मामांचं निधन झालं होतं. त्यांच्या शोकसभेसाठी ते सकाळी पाच वाजता उठून सातच्या विमानाने दिल्लीला गेले होते. त्यानंतर रात्री 9.30 वाजताच्या विमानानं विकास परत येत होते. जवळच्या व्यक्तींना गमावल्यामुळे ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकले होते. विमानात चढल्यावर विस्ताराच्या केबिन क्रूला, मला एक चादर द्या, मला झोपायचं आहे, तसेच मला जेवणासाठीही उठवू नका," असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे झोपलेल्या व्यक्तीचा पाय पुढच्या सीटपर्यंत गेला, तर त्याला लैंगिक अत्याचार किंवा विनयभंग म्हणायचं का?, तसेच घडलेल्या घटनेबाबत त्यांनी ताबडतोब आरडाओरडा करत क्रूला का बोलवलं नाही?, मुलगी अल्पवयीन होती मात्र तिची आईदेखील तिच्यासोबत होती. तिनं आईकडे याची तक्रार का केली नाही? आईनं याची दखल का घेतली नाही?, असा दावा सचदेव यांच्यावतीनं कोर्टात करण्यात आला.

जर कोणी पाय घासत असेल तर हालचाल दिसायला हवी, पण पीडितेनं काढलेल्या व्हिडीओमध्ये सचदेव यांचा पाय स्थिर असल्याचं दिसत आहे. असा दावा करत विकास सचदेव यांनी कोर्टाला सांगितलं की, विमान लॅण्ड होताना, अभिनेत्री म्हणाली होती की, तुम्ही तुमचे पाय माझ्या डोक्यावर का ठेवत नाही? यावर विकास सचेदव तिला म्हणाले की, "मॅडम मी गाढ झोपेत होतो. त्यामुळे मला समजलं नाही, जर तुम्हाला त्रास झाला असेल तर. मी माफी मागतो. तुम्हाला त्रास देण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता". मात्र झायरानं कोर्टाला सांगितलं की, "सुरुवातीला विमान हेलकावे खात असल्याच्या कारणावरुन आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्यानंतर विमानातील दिवे बंद होताच त्यानं पुन्हा असभ्य वर्तन केलं. तेव्हा मी व्हिडीओ काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र लाईटच्या कमतरतेमुळे ते शक्य झालं नाही. सीटच्या मागून हा इसम माझ्या पाठीला आणि मानेला पाय लावत होता. क्रू मेंबर्सकडे याची तक्रार करण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही दाद न दिल्यामुळे मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर सोशल मीडियावरून आपली व्यथा मांडली. घडलेला प्रकार पाहता देशातील मुलींची तुम्ही अशी काळजी घेणार का?" असा सवाल तिनं उपस्थित केला होता.
या संपूर्ण प्रकाराची मुंबई पोलिसांसह महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली होती. तर विस्तारा एअरलाईन्सनंही याबाबत दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं आहे.
संबंधित बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Vasai News: वसईतील 'त्या' भयानक महापुराचा धडकी भरवणारा पुरावा; तब्बल 12 दिवसांनी नाल्यातून बाहेर काढली कार, अवस्था पाहून तुम्हालाही बसेल धक्का!
वसईतील 'त्या' भयानक महापुराचा धडकी भरवणारा पुरावा; तब्बल 12 दिवसांनी नाल्यातून बाहेर काढली कार, अवस्था पाहून तुम्हालाही बसेल धक्का!
Nashik Crime News: चिकन व्यावसायिकाला अडवलं, 'गुटखा तस्करी'ची भीती दाखवून पैसेही उकळले; नंतर पुन्हा पैशांची मागणी करणारा लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
चिकन व्यावसायिकाला अडवलं, 'गुटखा तस्करी'ची भीती दाखवून पैसेही उकळले; नंतर पुन्हा पैशांची मागणी करणारा लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात अडकला, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींसाठी पुढचे 7 दिवस कसे असतील? नोकरी, व्यवसाय आणि करिअरला मिळणार गती? साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींसाठी पुढचे 7 दिवस कसे असतील? नोकरी, व्यवसाय आणि करिअरला मिळणार गती? साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Beed Crime News: दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
दुचाकीवरून जाताना अडवलं, काही समजायच्या आतच हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणाला भररस्त्यात संपवलं; घटनेनं बीडमध्ये खळबळ
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
नेपाळमध्ये पुन्हा तरुणाईच्या आंदोलनाचा भडका! तीन दिवसात तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न, नेमकं काय घडतंय? पंतप्रधानांवर जनविरोधी आणि हुकूमशाही पद्धतीने शासन केल्याचा आरोप
Kolhapur Crime: कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
Moshi Building Collapse: लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
लग्नाला महिना पूर्ण होण्यापूर्वीच काळाचा घाला; पत्नीला पुण्यात घेऊन यायची तयारी, मोशीत घरही फायनल झालं, पण सारंच होत्याचं नव्हतं झालं! कचरा डेपो दुर्घटनेत अंत
Embed widget