बॉलिवूडमधून निवृत्ती घेतलेल्या झायरा वसिमच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, नेटिझन्सकडून ट्रोल
थम धर्माचं कारण देत निवृत्तीची घोषणा करणे आणि त्यानंतर नव्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणे हे दुहेरी वागणं नेटिझन्सला आवडलेलं नाही, हा सर्व प्रकार फक्त पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोपही झायरावर फॅन्सकडून केला जातोय.
मुंबई: आरएसवीपीच्या 'द स्काय इज पिंक' या सिनेमावर नेटिझन्सने हल्ला केला आहे, या आगामी हिंदी सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालंय. चित्रपटाचं ट्रेलर काही वेळापूर्वी 'आरएसवीपी'ने शेअर केलं, मात्र सर्वांचं लक्ष हे झायरा वसिमकडे गेलं, त्याचं कारण असं की काही महिन्यांपूर्वी दंगल आणि सिक्रेट सुपरस्टार फेम झायरा वसीम हिने चित्रपटसृष्टीतून एक्झिट घेण्याचं ठरवलं होतं.
वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी आणि 5 वर्षाच्या बॉलिवूड करिअरनंतर तिने बॉलिवूडला अलविदा केला, झायराच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. झायराने सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपला निर्णय चाहत्यांपर्यंत पोहोचवला. "अल्लाहने दाखवलेल्या रस्त्यापासून भटकले होते", असा उल्लेख झायराने आपल्या पोस्टमध्ये केला होता. या काश्मिरी अभिनेत्रीने आपल्या धार्मिक श्रद्धेमुळे चित्रपटसृष्टी सोडण्याची घोषणा केली.
View this post on Instagram
टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये (TIFF) 13 सप्टेंबरला या चित्रपटाचं प्रिमिअर होणार आहे, यासंबंधी ट्वीट करताना प्रियांका चोप्राने कास्टचा समुद्रावरील एक फोटो शेअर केला, ज्यात झायराही होती. प्रथम धर्माचं कारण देत निवृत्तीची घोषणा करणे आणि त्यानंतर नव्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणे हे दुहेरी वागणं नेटिझन्सला आवडलेलं नाही, हा सर्व प्रकार फक्त पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोपही झायरावर फॅन्सकडून केला जातोय.
या प्रकरणाची दुसरी बाजू अशी आहे की चित्रपटाचं दिग्दर्शन गेल्या वर्षीच झालं होतं, ऑगस्ट 2018 मध्ये चित्रिकरणाला सुरुवात झाली आणि 11 मार्च 2019 पर्यंत संपूर्ण चित्रपट चित्रित करुन झाला. सिनेसृष्टीतून निवृत्ती घेण्याची घोषणा झायराने मे महिन्यात केली, म्हणजेच सर्व शूटिंग संपल्यानंतर. सिनेमाचा भाग असल्यामुळे प्रिमिअर आणि प्रमोशनल इव्हेंट्समध्ये झायरा दिसणार यात काही नवल नाही मात्र या सिनेमानंतर झायरा तिच्या फिल्म करिअरचा काय निर्णय घेतेय याकडे सर्वांचं लक्ष असेल.
On my way to @TIFF_NET today. Can't wait for the rest of the team to join me for the premiere on the 13th. So excited for the amazing early reviews & to share this with the world!#TheSkyIsPink pic.twitter.com/zu0ojsQZfl
— PRIYANKA (@priyankachopra) September 7, 2019
'द स्काय इज पिंक' सिनेमा 11 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ रॉय कपूर, रॉनी स्क्रूवाला यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर, शोनाली बोस यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटाची कास्टही तगडी आहे, देसी गर्ल प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, झायरा वसीम आणि रोहित सराफ मुख्य भूमिकेत आहेत.
निवृत्तीची घोषणा केल्यानंतर झायराला मिळालेल्या प्रतिक्रिया भाजपचा सवाल, उमर अब्दुल्लांचा पाठिंबा भाजपनेही झायरा वसीमच्या निर्णयावर टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन म्हणाले की, "धर्माच्या आधारावर अभिनय सोडण्याचा निर्णय दबावात घेतल्याचं दिसत आहे. ती सातत्याने कट्टरवादी संघटनांच्या निशाण्यावरही होती. अबू आझमी यांचंही समर्थन अभिनेत्री झायरा वसीमचा हा निर्णय इस्लाम धर्माचं पालन करणाऱ्यांसाठी योग्य आहे, असं म्हणत अबू आझमी यांनी तिच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. इस्लाम धर्मात नाच-गाणं चालत नाही, असंही ते म्हणाले. शिवसेनेची टीका धर्माच्या नावावर सिनेसृष्टी सोडण्याच्या निर्णयावर शिवसेनेने टीका केली आहे. शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी झायराच्या या निर्णयावर भलीमोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे की, "जर तुला ते आकर्षित करत असेल तर तू तुझ्या आस्थेचं पालन करु शकते. पण तुझ्या करिअरचा निर्णय धर्माशी जोडू नको. तुझं हे पाऊल तुझ्या धर्माला असहिष्णु ठरवतं, पण प्रत्यक्षात असं नाही. हा निर्णय तिच्या (झायरा वसिम) धर्मासाठी एक प्रतिगामी पाऊल आहे आणि इस्लाममध्ये सहिष्णुतेला जागा नाही, या चुकीच्या धारणेला आणखी हा निर्णय दुजोरा देतो.संबंधित बातम्या
'दंगल' फेम अभिनेत्री झायरा वसीमचा बॉलिवूडला अलविदा
अभिनय सोडण्याच्या झायरा वसीमच्या निर्णयावर शिवसेनेचा सवाल
चार वर्षांपासून डिप्रेशनमध्ये, 'दंगल'गर्ल झायरा वसिमची पोस्ट