एक्स्प्लोर

झायरा वसिमसोबत असभ्य वर्तन, पोस्को अंतर्गत गुन्हा

एअर विस्ताराच्या विमानात छेडछाड झाल्याचा आरोप झायराने इन्स्टाग्रामवर केल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगानेही याची दखल घेतली आहे

मुंबई : 'दंगल गर्ल' झायरा वसिम सोबत विमानात झालेल्या असभ्य वर्तन प्रकरणी मुंबईतील सहार पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कलम 354 अन्वये आणि झायरा अल्पवयीन असल्यामुळे 'पोस्को' अंतर्गत अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. झायरासोबत झालेल्या असभ्य वर्तनाची थेट राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घेतली आहे. मुंबई पोलिसांनी सहार पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना झायरा राहत असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन तिने केलेल्या तक्रारीकडे लक्ष देण्याचे आदेश दिले होते.

'दंगल गर्ल' झायराशी विमानात छेडछाड, केबिन क्रूचा कानाडोळा

एअर विस्ताराच्या विमानात छेडछाड झाल्याचा आरोप झायराने इन्स्टाग्रामवर केल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगानेही याची दखल घेतली. याबाबत काय कारवाई केली, याचा अहवाल देण्यास विमान कंपनीला सांगण्यात आलं होतं. दरम्यान, एअर विस्ताराने ट्वीट करुन झायराची माफी मागितली आहे. या प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगत झायराला वेळोवेळी मदत करण्याचं आश्वासनही विस्ताराने दिलं आहे. असे प्रकार आम्ही कधीच खपवून घेत नाही, असंही एअर विस्ताराने स्पष्ट केलं आहे. https://twitter.com/airvistara/status/939683874350747649 https://twitter.com/airvistara/status/939731693736300544 काय आहे प्रकरण? एअर विस्ताराच्या विमानाने झायरा दिल्लीहून मुंबईला येत होती. त्यावेळी विमानात झायराच्या मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीनं आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचं झायराने सांगितलं. विशेष म्हणजे या प्रकाराची विमानातील कर्मचाऱ्यांकडे तक्रार देऊनही कुणीही आपल्या मदतीला न आल्याचा दावा तिने केला आहे. सुरुवातीला विमान हेलकावे खात असल्याच्या कारणावरुन आपण दुर्लक्ष केलं. मात्र त्यानंतर विमानातील दिवे बंद होताच त्याने पुन्हा असभ्य वर्तन केल्याचं झायराने सांगितलं. मी व्हिडिओ काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र लाईटच्या कमतरतेमुळे ते शक्य झालं नसल्याचं झायरा म्हणाली. सीटच्या मागून हा इसम झायराच्या पाठीला आणि मानेला पाय लावत होता. केबिन क्रू किंवा विमानातील सहप्रवाशी आपल्या मदतीला न आल्याचंही झायराने सांगितलं. झायराच्या तक्रारीला कोणीही दाद न दिल्यामुळे तिने मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर इन्स्टाग्राम लाईव्हवरुन आपली व्यथा मांडली. घडलेला प्रकार सांगताना झायरला अक्षरशः रडू कोसळलं. मुलींची तुम्ही अशी काळजी घेणार का? असा प्रश्न उपस्थित करताना तिला अश्रू अनावर झाले.  पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget