एक्स्प्लोर

सीरमची लस असुरक्षित असल्याचा चेन्नईच्या स्वयंसेवकाचा आरोप; सीरमने आरोप फेटाळले, 100 कोटींचा दावा

संबंधित व्यक्तीने ही लस असुरक्षित असून याची चाचणी, उत्पादन आणि वितरण थांबवण्याची मागणी केली आहे. त्याविरूद्ध कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला.

पुणे : चेन्नई येथे चाचणी सुरु असलेली कोरोना लस घेतलेल्या 40 वर्षीय व्यक्तीने सीरम इन्स्टिट्युटवर गंभीर आरोप केले आहेत. या व्यक्तीने व्हर्च्युअल न्यूरोलॉजिकल ब्रेकडाऊन आणि विचार करण्याची क्षमता कमकुवत झाल्याची तक्रार करत सीरम इन्स्टिट्युटला आणि इतरांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच लस तपासणी करणे थांबवण्याची मागणी केली आहे. मात्र सीरम इन्स्टिट्युटने या व्यक्तीचे आरोप फेटाळले आहेत.

या व्यक्तीने ही लस असुरक्षित असून याची चाचणी, उत्पादन आणि वितरण थांबवण्याची मागणी केली आहे. त्यासोबतच कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला. ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि औषधी कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांच्याशी करार केलेल्या पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला (एसआयआय) या व्यक्तीने कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

या व्यक्तीने नोटीसमध्ये असा आरोप केला आहे की लसीकरणानंतर त्याला तीव्र एन्सेफॅलोपॅथी, मेंदूला हानी पोहोचवणाऱ्या आजाराची लागण झाली आहे. सर्व तपासन्यांमध्ये स्पष्ट झालं आहे की लसीच्या चाचणीने आरोग्य स्थिती बिघडली आहे. या व्यक्तीला 1 ऑक्टोबर रोजी ही लसी देण्यात आली होती.

सीरम इन्स्टिट्युने आरोप फेटाळून लावले

दुसरीकडे सीरम इन्स्टिट्यूटने या व्यक्तीचे आरोप फेटाळून लावले आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने एक निवेदन जारी केले आहे, त्यात म्हटलं की, स्वयंसेवकाने नोटीसद्वारे केलेले आरोप चुकीचे आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया स्वयंसेवकाच्या वैद्यकीय स्थितीबद्दल सहानुभूती दर्शवत आहे. मात्र कोरोना लसीची चाचणी व स्वयंसेवकाच्या वैद्यकीय स्थिती यांचा काहीही संबंध नाही. स्वयंसेवक त्याच्या वैद्यकीय समस्यांचा दोष कोरोना लस चाचणीवर चुकीच्या पद्धतीने करत आहे. या स्वयंसेवकाकडून चुकीच्या पद्धतीने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची बदनामी केली जात आहे. सीरम इन्स्टिट्यूट यासाठी 100 कोटींपेक्षा जास्त नुकसान भरपाईची मागणी करेल आणि अशा दाव्यांपासून बचाव करेल, असं सीरम इन्स्टिट्युटने आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MUM Vs J&K Ranji Trophy : मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
रेल्वे अपघातापूर्वी नातवाला व्हिडिओ कॉल, पण 10 वर्षांपासून भेट नव्हती; आजीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
रेल्वे अपघातापूर्वी नातवाला व्हिडिओ कॉल, पण 10 वर्षांपासून भेट नव्हती; आजीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Rohit Pawar : शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Tour : राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल, ३ दिवस दौरा, कार्यकर्त्यांशी साधणार संंवादABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 23 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : 'ढोंग बंद करा, बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या', राऊतांचं शाहांना आव्हानPune Crime : कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या,पुण्यात कौर्याची परिसीमा,खून केल्यावर व्हिडीओ चित्रीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MUM Vs J&K Ranji Trophy : मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
मुंबई 120 धावांवर ऑल आउट! गंभीरने चॅम्पियन ट्रॉफीतून फुली मारलेल्या पठ्ठ्याने घातला धुमाकूळ, ठोकले अर्धशतक
Ranji Trophy : 6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
6 फूट 4 इंच उंचीचा कोण उमर नझीर? ज्याने एक-एक रन काढण्यासाठी रोहित शर्माला अक्षरशः रडवले, पाहा VIDEO
रेल्वे अपघातापूर्वी नातवाला व्हिडिओ कॉल, पण 10 वर्षांपासून भेट नव्हती; आजीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
रेल्वे अपघातापूर्वी नातवाला व्हिडिओ कॉल, पण 10 वर्षांपासून भेट नव्हती; आजीसह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Rohit Pawar : शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या 'त्या' वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, कामाठीपुरातून 5 जणांना अटक; क्राइम ब्रँचकडून तपास
बांग्लादेशी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ, कामाठीपुरातून 5 जणांना अटक; क्राइम ब्रँचकडून तपास
Shani Asta 2025 : पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
पुढचे 37 दिवस शनि होणार अस्त; 3 राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, आरोग्य आणि आर्थिक स्थितीसह सर्वच ढासळणार
Nitesh Rane : कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
कॉलर टाईट करा, पीर-बीर बाबांना विचारू नका, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, सैफ अली खानच्या हल्ल्यावरही संशय, बावनकुळे म्हणाले...
Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Embed widget