COVID-19 Cases in Maharashtra : कोरोनानं पुन्हा धाकधूक वाढली, ILI आणि SARI सर्वेक्षण सुरू; आरोग्य विभागाकडून महत्वाचे आवाहन, राज्यात रुग्णांची संख्या किती?
COVID-19 Cases in Maharashtra : राज्यासह देशात काही ठिकाणी कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्या अनुषंगाने सद्यस्थितीत कोविडसाठी महाराष्ट्रामध्ये ILI आणि SARI सर्वेक्षण चालू आहे.

COVID-19 Cases in Maharashtra : कोविड हा आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. सद्यस्थितीत कोविडसाठी महाराष्ट्रामध्ये ILI (Influenza like Illness) आणि SARI (Severe Acute Respiratory Infection) सर्वेक्षण चालू आहे. त्या सर्वेक्षणामध्ये अशा रुग्णांची कोविडसाठी चाचणी केली जाते. यात कोविड रुग्णांचा पॉझीटीव अहवाल आल्यानंतर नियमित उपचार केले जात आहेत. राज्यात सध्या कोविड केसेस तुरळक आहेत. कोविड रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी आणि उपचाराची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे जनतेला आवाहन करण्यात येते आहे कि कोणीही घाबरून जाऊ नये. अशी माहिती महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमातून देण्यात आली आहे. दरम्यान 30 मे रोजी कोविड रुग्णांच्या सद्यःस्थिती बद्दलही माहिती समोर आली आहे.
राज्यातील कोविडची सद्यःस्थिती (दिनांक 30 मे 2025)
जानेवारी 2025 पासून केलेल्या कोविड चाचणी संख्या - 10,324
जानेवारी 2025 पासून पॉझीटीव रुग्ण - 681
आज रोजी पर्यंत 207 रुग्ण बरे झाले आहेत.
30 मे 2025 रोजी पॉझीटीव रुग्ण - 84
मुंबई - 32
ठाणे-2
ठाणे मनपा - 14
नवी मुंबई मनपा-1
कल्याण-डोंबिवली मनपा –1
रायगड- 2
पनवेल मनपा -1
नाशिक मनपा -1
पुणे- 3
सातारा - 2
कोल्हापूर-1
कोल्हापूर मनपा-1
पुणे मनपा- 19
पिंपरी चिंचवड मनपा- 1
सांगली मनपा-3
राज्यात सक्रीय रुग्णांची संख्या किती?
राज्यात सध्या सक्रीय असलेले रुग्ण-467
जानेवारी 2025 पासून मुंबईमधील एकूण रुग्ण संख्या - 411 ( जानेवारी - 1, फेब्रुवारी- 1, मार्च-1, एप्रिल-4, मे- 405)
सर्व निदान झालेले रुग्ण हे सौम्य स्वरूपाचे आहेत. तर जानेवारी 2025 पासून आजपर्यंत सद्व्याधीने ग्रस्त असलेले 6 व इतर 1 असे एकूण 7 रुग्ण दगावले आहेत. यापैकी एका रुग्णास नेफ्रोटिक सिंड्रोमसह हायपोकॅल्सिमिक सीझर होते आणि दुसऱ्या रुग्णास कर्करोग होता. तसेच तिसऱ्या रुग्णास ब्रेन स्ट्रोक (Cerebrovascular Disease) झाला होता आणि फिट येत होती. चौथ्या रुग्णास डायबेटिक किटोएसिडोसिस (DKA with LRTI) आजार होता. पाचव्या रुग्णास ILD (Interstitial Lung Disease) होता. सहाव्या रुग्णास डायबेटीस होता व 2014 पासुन अर्धांगवायू झालेला होता. सातवा रुग्ण 47 वर्षीय महिला असून, सदर महिलेस ताप आणि धाप लागणे हि लक्षणे होती. कोविड रुग्णांची तुरळक वाढ फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर इतर राज्यात तसेच काही इतर देशात देखील दिसून येत आहे.
हे ही वाचा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























