Viral Video : रिक्षात AC लावता आला नाही म्हणून लावला कूलर.. व्हायरल होतोय व्हिडीओ
सोशल मिडीयावर सध्या एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी एका रिक्षावाल्याने चक्क कूलर आपल्या रिक्षात लावला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

Desi Jugaad Viral Video : सोशल मिडीयावर (Social Media) रोज काही ना काही व्हायरल होत असते. सध्या उन्हाळ्याचा ऋतू सुरू आहे. बरीच लोक उन्हाळ्याचा सुट्ट्यांकरीता थंड ठीकाणी जातात. आता या उकाड्यापासून वाचण्यासाठी लोक काय करत नाहीत. अशातच एका रिक्षावाल्याने तापमानाचा वाढता पारा पाहता उन्हापासून वाचण्यासाठी आगळावेगळा जुगाड केला आहे.
याच रिक्षावाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral) होतोय. रिक्षावाल्याने चक्क आपल्या रिक्षाच्या मागे कूलर लावला आहे. हा व्हिडीओ (Video) पाहून नेटकरी हैराण तर झाले आहेत. व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून या व्हिडीओला नेटकरी पसंती दर्शवत आहेत.
View this post on Instagram
रिक्षात लावला कूलर
वाढत्या तापमानात थंड वाटावे म्हणून लोक आपल्या वाहनात काय काय बदल करतील याचा नेम नाही. काही जण ओला कपडा लावतात तर काही लोक अक्षरक्ष: गाडीवर गवत लावतात. यापूर्वी ही एका रिक्षावाल्याने उन्हामुळे आतून संपूर्ण रिक्षात गवत लावले होते आणि प्रवाशासाठी पाणी पिण्यासाठी ठेवले होते. आता कहर एकाने रिक्षाच्या मागेच कूलर लावला आहे. इंस्टाग्रामवर (Instagram) kabir_setia नावाच्या एका यूजरने हा व्हिडीओ त्याच्या अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यात कूलर लावलेला दिसत आहे. ज्यामुळे पॅसेँजरला (Passenger) आणि ड्रायव्हरला थंडावा मिळू शकतो.
व्हिडीओला मिळाले हजारोंहून जास्त व्ह्यूज
जुगाड केलेल्या या व्हिडीओला खूप पसंती (Likes) मिळत आहे. सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओला काही तासातच 2 लाख 15 हजार यूजर्सने लाइक केले आहे तर हजारोंहून जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहीला आहे. एका अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला सोशल मिडीयाच्या इतर अनेक पेजवरही शेअर करण्यात आले आहे. तसेच या अनोख्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी फार मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने कमेंट केली आहे , "बहुत बढीया" . तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली आहे कि, "भाई ने पब्लिक के बारे में सोचा है". तिसऱ्या यूजरने लिहीले आहे , "मैं गलत आॅटोवाले को पैसे दे रहा हूँ".
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
