एक्स्प्लोर
Advertisement
मेट्रो 3 च्या स्थानकाचा व्यावसायिक वापर, महसूल वाढीसाठी सिद्धीविनायक स्थानक परिसर भाड्याने देणार
रिटेल दुकानदार, ऑफिस, बॅंक, शैक्षणिक संस्था, रेस्टॉरंट अशा स्वरुपाच्या व्यावसायिक वापरातून महसूल उत्पन्नवाढ केली जाणार आहे. मेट्रो 3 हा मार्ग एमएमआरसीएल सार्वजनिक पायाभूत सुविधा म्हणून चालवायचा आहे. त्यासाठी अशा पद्धतीने स्टेशन परिसरात दुकाने किंवा वाणिज्यिक वापर करण्याचा एमएमआरसीएलचा विचार आहे.
मुंबई : कुलाबा-वांद्रे- सीप्झ या मेट्रो 3 मार्गावरील सिद्धीविनायक मंदीर या प्रस्तावित स्थानक परिसराचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय एमएमआरसीएलने घेतला आहे. यामुळे एमएमआरसीएलला महसूल मोठ्या प्रमाणावर मिळण्याची शक्यता आहे. मेट्रो 3 मार्गावरील सर्वात जास्त प्रवासी संख्या सिद्धीविनायक मंदिर स्टेशनवर असेल असा एमएमआरसीएलचा अंदाज आहे.
मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंदिर असलेल्या प्रभादेवीच्या सिद्धीविनायक मंदिरापासून काही अंतरावर मेट्रो 3 चे हे स्थानक होणार आहे. या मंदिरात दर दिवशी सुमारे 20 हजार भाविक येतात. मंगळवारी आणि संकष्टीच्या दिवशी ही संख्या 50 हजाराच्या वर पोहचते, तर अंगारकीच्या दिवशी इथे लाखो भक्त येत असतात. भविष्यात सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी येणारे बहुतेक भक्तगण मेट्रो 3 चा मार्ग अवलंबतील असा अंदाज आहे.त्यामुळे सिद्धीविनायक मंदीर स्थानक परिसराचा वाणिज्यिक वापर करून त्यातून उत्पन्न मिळविण्यात येणार आहे.
सिद्धीविनायक मंदिर स्थानक हे तीन मजली बांधण्यात येणार असून तळमजला आणि मुख्य मजल्याच्यामध्ये एक मॅगझिन लेव्हल तयार केली जाणार आहे. ही जागा वाणिज्यिक वापरासाठी देण्यात येणार आहे. रिटेल दुकानदार, ऑफिस, बॅंक, शैक्षणिक संस्था, रेस्टॉरंट अशा स्वरुपाच्या व्यावसायिक वापरातून महसूल उत्पन्नवाढ केली जाणार आहे. मेट्रो 3 हा मार्ग एमएमआरसीएल सार्वजनिक पायाभूत सुविधा म्हणून चालवायचा आहे. त्यासाठी अशा पद्धतीने स्टेशन परिसरात दुकाने किंवा वाणिज्यिक वापर करण्याचा एमएमआरसीएलचा विचार आहे.
सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टमार्फत विविध रुग्णांना वैद्यकीय मदत केली जाते. त्यांच्यावतीने मेट्रो 3 सिद्धीविनायक स्थानकांचा परिसर भाडेतत्वावर देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होत्या. त्या प्रस्तावावर सर्वांकष विचाराअंती एमएमआरसीएलने यास हिरवा कंदिल दाखविला आहे. सध्या सिद्धीविनायक मंदिरातील कार्यालयात येऊन रुग्णांचे नातेवाईक वैद्यकीय मदत मिळविण्यासाठीचे अर्ज भरतात. याच ठिकाणी त्यांना अन्य माहिती दिली जाते. आधीच भक्तांची गर्दी आणि त्यात रुग्णांच्या नातेवाईकांची भर पडत असल्याने सुरक्षारक्षकांवरही ताण पडतो. तसेच तणावात असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना वैद्यकीय माहितीगारांकडून नीट माहिती दिली जात नाही.
त्यापेक्षा स्टेशन परिसरात असा वेगळा कक्ष निर्माण केला तर त्याठिकाणी मेट्रो स्टेशनवर उतरताच रुग्णाच्या नातेवाईकाचे योग्य ते निरसन केले जाऊ शकते अशा पद्धतीचा हा प्रस्ताव सिद्धीविनायक मंदिराच्या वतीने सादर करण्यात आला होते. याशिवाय या परिसरातील काही नागरिकांनीही अशाच पद्धतीने व्यावसायिक आस्थापने मेट्रो स्टेशन परिसरात सुरू करण्याची परवानगी एमएमआरसीएलकडे मागितली होती.
त्याअंती एमएमआरसीएलने सिद्धीविनायक मंदिर स्टेशन परिसराचा वाणिज्यिक वापराच्या प्रस्ताव तयार केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लवकरच हा प्रस्ताव एमएमआरसीएलच्या बैठकीत सादर केला जाणार असून त्यास मंजुरी मिळाल्यानंतर तो सरकारकडे मंजुरीला पाठविला जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
हिंगोली
निवडणूक
Advertisement