एक्स्प्लोर
स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी शिवसेनेची भूमिका स्पष्ट, मात्र सरकार म्हणून आमच्यात एकवाक्यता : उद्धव ठाकरे
भाजपने आम्हाला सावरकरांच्या मुद्द्यावरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र देशात नागरिकत्व सुधारणा विधेयकानंतर उफाळलेल्या हिंसाचाराचं काय? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
नागपूर : आम्ही वेगवेगळ्या पक्षांचे नेते आहोत. आम्ही भिन्न विचारांची माणसं आहोत. कालही आमच्या विचारात भिन्नता होती. आजही त्यात भिन्नता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीची भूमिका शिवसेनेनं मांडली आहे. मात्र, सरकार चालवण्यासाठी समान कार्यक्रम ठरवला आहे. सरकार म्हणून आमच्यात एकवाक्यता आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्यांसह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्याबद्दल शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. भाजपने आम्हाला सावरकरांच्या मुद्द्यावरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करु नये. भाजपने आणलेला नागरिकत्व सुधारणा कायदा हा सावरकरांच्या भूमिकेविरोधी आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी ठाकरे म्हणाले की, भाजपने आम्हाला सावरकरांच्या मुद्द्यावरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र देशात नागरिकत्व सुधारणा विधेयकानंतर उफाळलेल्या हिंसाचाराचं काय? असा सवाल त्यांनी केला.
यावेळी ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करण्याच्या दिशेनं पाऊल उचलत आहे. शेतकरी कर्जमाफीबद्दल लवकरात लवकर चांगला निर्णय घेतला जाईल. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मी विरोधी पक्षासाठी काम करत नाही. आम्ही जनतेसाठी काम करणार आहोत. आमचं मंत्रिमंडळ जनतेला बांधिल आहे. विरोधी पक्षाला नाही, असं ते म्हणाले. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 23 हजार कोटींची गरज असल्याच्या मुद्याचा हवाला देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली होती.
देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या 23 हजार कोटींच्या मदतीच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, काही जणांना बोलायची सवय असते. त्यांना बोलू द्या. मी विरोधी पक्षासाठी काम करत नाही. आमचं मंत्रिमंडळ जनतेसाठी काम करणार आहे आणि जनतेशी बांधिल आहे. हे अधिवेशन सहा दिवसांचं असलं, तरी सरकारचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
हे ही वाचा - शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करण्याच्या दिशेनं पाऊल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यावेळी समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देणार का? या प्रश्नावर ठाकरे यांनी नाव देणार का? नाही तर नाव दिलं असं म्हणतं या नामकरणावर शिक्कामोर्तब केलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या घोटाळ्याबाबत बोलताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकात जर कोणी घोटाळा केला असेल तर ते निंदाजनक आहे, या प्रकरणात जो कोणी जबाबदारी असेल त्याच्या विरोधात कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी विरोधकांच्या 'स्थगिती सरकार' च्या आरोपाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई आणि राज्यातील कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही. फक्त आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिलेली आहे. रात्रीतून तेथे वृक्षतोड करून सजीवसृष्टी नष्ट करण्यात आल्यानं स्थगिती दिलेली आहे. सरकारने कोणत्या कामांना स्थगिती दिली त्याची यादी त्यांनी द्यावी, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement