एक्स्प्लोर

शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करण्याच्या दिशेनं पाऊल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या 23 हजार कोटींच्या मदतीच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, काही जणांना बोलायची सवय असते. त्यांना बोलू द्या. मी विरोधी पक्षासाठी काम करत नाही. आमचं मंत्रिमंडळ जनतेसाठी काम करणार आहे आणि जनतेशी बांधिल आहे.

नागपूर : शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करण्याच्या दिशेनं पाऊल उचलत आहे. शेतकरी कर्जमाफीबद्दल लवकरात लवकर चांगला निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपुरात सांगितलं. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्यांसह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मी विरोधी पक्षासाठी काम करत नाही. आम्ही जनतेसाठी काम करणार आहोत. आमचं मंत्रिमंडळ जनतेला बांधिल आहे. विरोधी पक्षाला नाही, असं ते म्हणाले. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 23 हजार कोटींची गरज असल्याच्या मुद्याचा हवाला देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या 23 हजार कोटींच्या मदतीच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, काही जणांना बोलायची सवय असते. त्यांना बोलू द्या. मी विरोधी पक्षासाठी काम करत नाही. आमचं मंत्रिमंडळ जनतेसाठी काम करणार आहे आणि जनतेशी बांधिल आहे. हे अधिवेशन सहा दिवसांचं असलं, तरी सरकारचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देणार का? या प्रश्नावर ठाकरे यांनी नाव देणार का? नाही तर नाव दिलं असं म्हणतं या नामकरणावर शिक्कामोर्तब केलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या घोटाळ्याबाबत बोलताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकात जर कोणी घोटाळा केला असेल तर ते निंदाजनक आहे, या प्रकरणात जो कोणी जबाबदारी असेल त्याच्या विरोधात कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी विरोधकांच्या 'स्थगिती सरकार' च्या आरोपाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई आणि राज्यातील कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही. फक्त आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिलेली आहे. रात्रीतून तेथे वृक्षतोड करून सजीवसृष्टी नष्ट करण्यात आल्यानं  स्थगिती दिलेली आहे. सरकारने कोणत्या कामांना स्थगिती दिली त्याची यादी त्यांनी द्यावी, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. विधीमंडळाच्या अधिवेशनात चहापानाची प्रथा आहे. मात्र विरोधकांनी बहिष्कार घालायचा ही पोटप्रथा देखील आहे, असा टोला त्यांनी लगावला. आज चहा दिवस आहे आणि पंतप्रधानांची पार्श्वभूमी काय आहे हे सर्वांना माहिती आहे. मात्र इथं विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला. कदाचित पंतप्रधान आणि राज्यातल्या नेत्यांमध्ये काही मतभेद असतील. मात्र मी असं बोलणार नाही, असेही ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री या नात्यानं पहिल्यांदाच आलो. मी ज्या वेळेस इथं आलो त्यावेळी माझं जोरदार स्वागत करण्यात आलं. मुख्यमंत्री म्हणून आमची कारकीर्द उद्यापासून सुरु होत आहे. माझ्या सर्व जनतेला आवाहान करतोय की तुमचे आशिर्वाद पाठिशी असू द्या. ज्या काही अपेक्षा आहेत त्यापूर्ण करू, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 8 October 2026: आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
Jantar Mantar Protest Rules : जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
जंतर-मंतरवर आंदोलन करायचं असेल तर 10 दिवस आधी परवानगी बंधनकारक, 50 हजारांपेक्षा जास्त गर्दी असल्यास थेट 'बुरारी'
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 
मोठी बातमी! 150 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज, लखनौमध्ये नेमकं काय घडलं? 

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget