एक्स्प्लोर

राज्यातील विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरु

आपल्या कामासाठी दूरवरुन नागरिक मुंबईत येतात. मुंबईत आल्यानंतर त्यांनी राहण्याची आणि अन्य गोष्टींची हेळसांड होते. त्यात त्यांचे काम होईलच असे नाही. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सामान्य नागरिकांना कामासाठी मंत्रालयात येण्याची गरज उरणार नाही.

मुंबई : प्रशासकीय कामात लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात ‘मुख्यमंत्री  सचिवालय कक्ष’  स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान घेतला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये   राज्यातील सर्व विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात “मुख्यमंत्री सचिवालय कक्ष” सुरु करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री सचिवालय कक्षात द्या अर्ज

सर्वसामान्य माणसाला त्याचे दैनंदिन आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी आपले गाव, शहर सोडून मुंबईला यावे लागू नये, त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचावेत या हेतूने हे कक्ष सुरु करण्यात आले आहेत. त्याचबरोबर क्षेत्रिय पातळीवरचे प्रश्न क्षेत्रियस्तरावरच सुटावेत, या प्रक्रियेला वेग मिळावा ही त्यामागची भूमिका  आहे. आता  सर्व विभागीय आयुक्त कार्यालयात असे ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ सुरु झाल्याने सर्वसामान्य माणसाला नक्कीच दिलासा मिळणार आहे.  त्यांना क्षेत्रिय स्तरावरचे प्रश्न घेऊन मुंबईला येण्याची आता गरज नाही. मुख्यमंत्री यांना संबोधून करण्यात येणारे अर्ज, निवेदने संदर्भ आता या विभागीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षात देऊ शकतील.

अर्जांवर अशी होणार कार्यवाही

या कक्षात आलेले अर्ज, निवेदने संबंधित क्षेत्रिय स्तरावरील यंत्रणेकडे योग्य कार्यवाहीसाठी त्वरित पाठवले जाणार असून, लोकशाही दिनाच्या दिवशी या अर्ज आणि निवेदनांवर नेमकी काय कार्यवाही झाली याचा आढावा घेण्यात येईल. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या विभागस्तरावरील कक्षामुळे गतिमानता येईल. विभागस्तरावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षात यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. विभागाचे महसुल उपायुक्त हे यासाठी पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी म्हणून काम पाहतील. शिवाय एक नायब तहसीलदार, एक लिपिक आणि एक लिपिक टंकलेखक हेही या कक्षात काम करतील.

पोच मिळणार- आढावा होणार

अर्ज, निवेदन घेऊन आलेल्या व्यक्तीने या कक्षात आपला अर्ज/ निवेदन सादर केल्यानंतर त्यांना पोचपावती देण्यात येईल. क्षेत्रियस्तरावर कार्यवाही अपेक्षित असलेले अर्ज विभागीय आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली संबंधित क्षेत्रिय अधिकाऱ्याकडे त्वरित पाठविण्यात येतील. ज्या अर्जांवर शासनस्तरावर कार्यवाही अपेक्षित आहे, जे विषय धोरणात्मक बाबींशी संबंधित आहेत अशा महत्वाच्या प्रकरणांशी संबंधित असलेले अर्ज ‍किंवा निवेदने मुख्यमंत्री सचिवालयातील प्रधान सचिवांकडे सादर करण्यात येतील. क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आलेले अर्ज, त्यावर झालेली कार्यवाही, प्रलंबित अर्ज याची माहिती मुख्यमंत्री सचिवालय कक्षात दर महिन्याच्या पाच तारखेपूर्वी सादर करण्यात येईल.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 सप्टेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 सप्टेंबर 2026 | बुधवार
हे 1994 च्या मुख्यमंत्र्यांचं पाप, विखे पाटलांनी शरद पवारांकडे बोट दाखवलं; जरांगे पाटील चांगलेच संतापले, म्हणाले...
हे 1994 च्या मुख्यमंत्र्यांचं पाप, विखे पाटलांनी शरद पवारांकडे बोट दाखवलं; जरांगे पाटील चांगलेच संतापले, म्हणाले...
Amit Thackeray and Siddhesh Kadam: अमित ठाकरे बालिश, मोदींचं नेतृत्त्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा; कृष्णराज महाडिकांनंतर आता सिद्धेश कदमांनी दंड थोपटले
अमित ठाकरे बालिश, मोदींचं नेतृत्त्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा; कृष्णराज महाडिकांनंतर आता सिद्धेश कदमांनी दंड थोपटले
माजी काँग्रेस आमदाराच्या निवासस्थानावर ईडीची छापेमारी; राहुल गांधींच्या आगामी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाची त्यांच्याच खांद्यावर जबाबदारी
माजी काँग्रेस आमदाराच्या निवासस्थानावर ईडीची छापेमारी; राहुल गांधींच्या आगामी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाची त्यांच्याच खांद्यावर जबाबदारी

व्हिडीओ

Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Babar Azam : पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
BCCI Meeting: गौतम गंभीर,अजित आगरकर आणि लक्ष्मणला एकाचवेळी तिघांना मुंबईत थेट बीसीसीआय मुख्यालयात बोलावलं! टीम इंडियात नेमकं काय घडतंय?
गौतम गंभीर,अजित आगरकर आणि लक्ष्मणला एकाचवेळी तिघांना मुंबईत थेट बीसीसीआय मुख्यालयात बोलावलं! टीम इंडियात नेमकं काय घडतंय?
धाराशिव बंदची हाक, धुळे-सोलापूर महामार्गावरही रास्ता रोको; जरांगेंची प्रकृती खालावली, मराठा बांधव आक्रमक
धाराशिव बंदची हाक, धुळे-सोलापूर महामार्गावरही रास्ता रोको; जरांगेंची प्रकृती खालावली, मराठा बांधव आक्रमक
माजी काँग्रेस आमदाराच्या निवासस्थानावर ईडीची छापेमारी; राहुल गांधींच्या आगामी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाची त्यांच्याच खांद्यावर जबाबदारी
माजी काँग्रेस आमदाराच्या निवासस्थानावर ईडीची छापेमारी; राहुल गांधींच्या आगामी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाची त्यांच्याच खांद्यावर जबाबदारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 सप्टेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 सप्टेंबर 2026 | बुधवार
Ram Mandir CEO : मोठी बातमी! अयोध्या राम मंदिराला मिळाले पहिले CEO; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी
मोठी बातमी! अयोध्या राम मंदिराला मिळाले पहिले CEO; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी
Manoj Jarange Patil: यांच्या डोक्यात वेगळं काहूर माजलंय, यांना 100 टक्के दंगल करायची आहे; मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप
यांच्या डोक्यात वेगळं काहूर माजलंय, यांना 100 टक्के दंगल करायची आहे; मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

Embed widget