(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये धार्मिक कार्यक्रमाच्या जेवणातून विषबाधा, 16 जणांवर उपचार सुरु
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : दरम्यान या घटनेत विषबाधा झालेल्या एकूण 16 लोकांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) गंगापूर तालुक्यातील मांजरी हद्दीतील कान्होबावाडी गावात धार्मिक कार्यक्रमाच्या जेवणातून विषबाधा झाला असल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दुपारी तयार करण्यात आलेलं जेवण रात्री पुन्हा काह्ण्यात आल्याने ही विषबाधा झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या घटनेत विषबाधा झालेल्या एकूण 16 लोकांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.
गंगापूर तालुक्यातील मांजरी हद्दीतील कान्होबावाडी येथील एका कुटुंबात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी अनेक पाहुणे देखील येणार असल्याने जेवणाची देखील सोय करण्यात आली होती. दरम्यान दुपारी जेवणाचे कार्यक्रम सुरु झाले. या धार्मिक कार्यक्रमात अनेकांनी जेवण देखील केलं. मात्र काही प्रमाणात जेवण उरल्याने रात्रीच्या सुमरास पुन्हा जेवण करण्यात आले. तर दुपारच जेवण कुटुंब व नातेवाइकांमधील लोकांनी रात्री पुन्हा केल्यानंतर त्यांना अचानक त्रास सुरु झाला. अनेकांना अस्वस्थ वाटू लागले. तर काहींना जुलाब, उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. रात्री एकूण 16 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आले आहे.
परिसरात एकच खळबळ उडाली
कान्होबावाडीत धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असताना यातील जेवण केल्याने अनेकांना त्रास सुरु झाला. जुलाब, उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने अनेकांना रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उपस्थित कुटुंबातील सदस्य आणि नातेवाइकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. एकाचवेळी 15-16 लोकांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान आता सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या सर्वांवर उपचार करून सायंकाळीच त्यांना घरी सोडण्यात आले.
यांना झाली विषबाधा....
रुग्णालयात केलेल्यांमध्ये मयुरी लोहकरे (20 वर्षे), सुरेखा तिखे (30 वर्षे), कांताबाई लोहकरे (45 वर्षे), आदर्श बुजाडे (6 वर्षे), बाबासाहेब तिखे (55 वर्षे), दत्तात्रय तिखे (32 वर्षे), किशोर तिखे (32 वर्षे), अनिता तिखे (35 वर्षे), आबासाहेब तिखे (55 वर्षे), हिराबाई तिखे (62 वर्षे), ज्योती बुजाडे (32 वर्षे), मंदाबाई तिखे (48 वर्षे), बबन लोहकरे (50 वर्षे), श्रद्धा बुजाडे (5 वर्षे), सर्वेश लोहकरे (10 वर्षे), मनीषा लोहकरे (31 वर्षे) यांचा समावेश होता.
इतर महत्वाच्या बातम्या:
Crime News : अडीच महिन्यांचे बाळ पाच लाखात विकले, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना