एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

संभाजीनगर शहरातून थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करा; नागरी विमान वाहतूक समितीच्या बैठकीत चर्चा

Chhatrapati Sambhaji Nagar : नागरी विमान वाहतूक विषयक संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

Chhatrapati Sambhaji Nagar News : नागरी विमान वाहतूक समितीच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगर शहरातून (Chhatrapati Sambhaji Nagar City) थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करा, तथा नांदेडहून उड्डाणे पुन्हा सुरू करण्याच्या मुद्यावर चर्चा झाली आहे. या बैठकीत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांच्याकडे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jalee) यांनी ही मागणी केली आहे. तर नांदेड आणि अमृतसर दरम्यान विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी लवकरच सर्व संबंधितांशी बैठक घेण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले आहेत. विशेषत: सौदी अरेबियातील जेद्दाहसाठी थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याच्या शक्यतांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. त्यामुळे उमराह करण्यासाठी मक्का आणि मदिना येथे जाणाऱ्या मुस्लिम यात्रेकरूंना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळू शकणार असल्याचं जलील म्हणाले आहेत. 

नागरी विमान वाहतूक समितीच्या बैठकीत जलील यांनी नांदेडहून उड्डाणे सुरु नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. ज्यामुळे हजारो शीख यात्रेकरूंची नांदेड आणि अमृतसरमधील दोन सर्वात आदरणीय प्रार्थनास्थळांना भेट देणार्‍यांची मोठी गैरसोय होत आहे. राज्य सरकारने त्यात एवढा पैसा गुंतवला असताना नांदेड विमानतळ अंबानींच्या ताब्यात का देण्यात आले, असा आक्षेपही त्यांनी घेतला. नागरी विमान वाहतूक विषयक संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. विशेष म्हणजे या समितीचे खासदार देखील सदस्य आहेत.

संभाजीनगर विमानतळाचे पूर्ण क्षमतेने उपयोग का होत नाही

जलील यांनी मुंबई विमानतळावरील गर्दी कमी करण्यासाठी आणि समृद्धीमुळे चांगली रस्ते जोडणी असल्याने विदर्भातील यात्रेकरूंसाठीही फायदेशीर ठरणार असल्याने उमराहसाठी थेट जेद्दाहला संभाजीनगरहून उड्डाणे सुरु करण्याची गरज असल्याचा मुद्दा अधोरेखित केला. तसेच आमच्याकडे अजिंठा आणि एलोरा येथे दोन जागतिक वारसा स्थळे आहेत. चांगली हवाई कनेक्टिव्हिटी म्हणजे अधिक पर्यटक शहरात येतील. संभाजीनगर मोठे विमानतळ उभारण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असताना त्याचा पूर्ण क्षमतेने उपयोग का होत नाही, असा सवालही जलील यांनी केला.

दुबई आणि सिंगापूरसारख्या ठिकाणी नवीन उड्डाणे सुरू करा 

तसेच जलील यांनी नागरी उड्डाण सचिवांशी छत्रपती संभाजीनगरहून दुबई आणि सिंगापूरसारख्या ठिकाणी नवीन उड्डाणे सुरू करण्याबाबत चर्चा केली. तसेच खासदार जलील यांनी ट्रॅव्हल एजंट्सची पत्रेही दिले ज्यात उमराहसाठी प्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी संभाजीनगर विमानतळावरून विमानसेवा सुरू करणाऱ्या विमान कंपन्यांची तिकिटे अगोदर खरेदी करण्याचे आश्वासन दिले आहे. खाजगी विमान कंपन्यांना दुबई आणि सिंगापूरला थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवण्यासाठी दरवाजे उघडतील, असे ते म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या: 

अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी जाताना उग्र परफ्यूम, लाल रंगाचे कपडे‎ टाळा; अन्यथा होऊ शकतो मधमाशांचा हल्ला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगरZero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget