महिला पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर; उद्धव ठाकरे यांची भेट होऊ देत नसल्याचा आरोप, खैरेंनी हात जोडले
Chhatrapati Sambhaji Nagar : उद्धव ठाकरेंशी भेट झाली नसल्याने महिला पदाधिकारी यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. त्यामुळे ठाकरेंची भेट न घेता महिला पदाधिकारी तेथून निघून गेल्या.
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (ऊबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) दौऱ्यावर आहे. शहरातील एका हॉटेलमध्ये त्यांनी मंगळवारी मुक्काम केला. दरम्यान, आज सकाळी माजी महापौर कला ओझा (Kala Ojha) यांच्यासह शिवसेनेच्या (Shiv Sena) काही महिला पदाधिकारी त्यांना भेटण्यासाठी हॉटेल रामामध्ये आल्या होत्या. मात्र, यावेळी त्यांची भेट झाली नसल्याने आपल्याला कोणी भेटू देत नसल्याचा आरोप कला ओझा यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी केला. तर, उद्धव ठाकरेंशी भेट झाली नसल्याने महिला पदाधिकारी यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. त्यामुळे ठाकरेंची भेट न घेता महिला पदाधिकारी तेथून निघून गेल्या.
महिला पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ताटकळत उभा असतानाच तिथे माजी खासदार चंद्रकांत खैरे देखील पोहचले. त्यामुळे महिला पदाधिकारी यांनी आपलं गाऱ्हाणे खैरे यांच्याकडे मांडले. पण खैरे हे महिला पदाधिकाऱ्यावरच भडकले. तुम्ही इथून निघून जा, मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही असे म्हणत त्यांनी महिलांसमोर हात जोडले. यावेळी त्यांनी या महिला पदाधिकारी यांना माध्यमांना प्रतिक्रिया देऊ नका असे दम देखिला भरला. या सर्व गोंधळानंतर महिला पदाधिकारी यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यांनी हॉटेलमधून काढता पाय घेतला.
आम्हाला सवयचं झाली....
उद्धव ठाकरे आज बुलढाणा जिल्ह्याचा दौरा करणार असून, यासाठी ते छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. दरम्यान, आज सकाळीच ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शहरातील काही महिला पदाधिकारी हॉटेलमध्ये पोहचल्या. मात्र, त्यांची कुणी भेटच घालून देत नसल्याने त्या ताटकळत उभ्या होत्या. यावेळी तिथे आलेल्या चंद्रकांत खैरे यांना ठाकरेंची भेट घालून द्यावी अशी विनंती महिलांनी केली. पण खैरे त्यांच्यावर चिडले. दरम्यान, याबाबत माध्यमांनी महिलांना विचारले असता आता आम्हाला सवयच झाली असल्याचे त्या म्हणाल्या.
ठाकरे गटातत गटबाजी?
लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे विरोधात अंबादास दानवे असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांकडून लोकसभेची उमेदवारी मागितली जात आहे. त्यामुळे पक्षात देखील खैरे विरुद्ध दानवे असे गट झाल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेले उद्धव ठाकरे हा वड सोडवणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :