एक्स्प्लोर

Chandrakant Khaire on Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलीलांना उमेदवारी जाहीर होताच चंद्रकांत खैरे कॉलर उडवत म्हणाले...

Chandrakant Khaire on Imtiyaz Jaleel, Chhatrapati Sambhajinagar : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Chandrakant Khaire on Imtiyaz Jaleel, Chhatrapati Sambhajinagar : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी यांनी याबाबतची घोषणा केली आहे. दरम्यान, जलील यांना उमेदवारी जाहीर होताच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी कॉलर उडवत उत्तर दिलं आहे. 

काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

चंद्रकांत खैरे म्हणाले, दैनिक सामनामध्ये बातमी आल्यानंतरच माझ्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल मिळालाय असे म्हणता येईल. बातमी लवकरच येईल. एकंदरीत या ठिकाणी तीन चार वेळेस कार्यालयाचं उद्घाटन केलं. आम्हाला लाभदायक आहे, म्हणून आम्ही हे कार्यालय घेतलेलं आहे. आता देखील बनवायचं काम सुरु आहे. विजय कोणचा होईल?  या प्रश्नाचे उत्तर देताना चंद्रकांत खैरे यांनी कॉलर उडवत शिवसेनाचा होईल, असं सांगितलं आहे. 

तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो

इम्तियाज जलील यांच्याबाबत बोलताना खैरे म्हणाले, कसलं आव्हान आलं. आव्हान वगैरे काही नाही. सगळ व्यवस्थित आहे. आम्ही सगळी तयारी करतोय. आम्ही स्ट्राँग आहोत. आम्हाला कोणावर टीका देखील करायची नाही. आपण आपलं काम करायचं. पुढचं चित्र जोरात आहे. 100 टक्के भगवा फडकणार आहे. आत्ताच फडकतोय. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो, असं चंद्रकांत खैरे यांनी विरोधकांना सागितलं आहे. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होणार

छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या जागेवरुन उमेदवारी देणार आहे. अद्याप ठाकरे आणि शिंदेंचा उमेदवार ठरलेले नाही. मात्र, महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरे गटाला जाणार आहे. तर महायुतीकडून ही जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलील (Imtiyaz Jaleel) यांच्या विरोधात इतर दोन उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, तिरंगी लढत होणार हे निश्चित मानले जात आहे. 

इम्तियाज जलील उमेदवारी जाहीर होताच काय म्हणाले?

पाच वर्षे संसदेत प्रतिनिधित्व केल्याबद्दल मी माझ्या मतदारसंघातील जनतेचे आभार मानतो. सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न केला आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध जोरदार लढा दिला. आता पुन्हा मी लोकांशी संपर्क साधेन आणि त्यांना मी काही चांगले केले असे वाटले तर ते नक्कीच माझ्या पाठीशी उभे राहतील. माझी खासदार म्हणून सुरुवातीची दोन वर्षे कोरोनामुळे पूर्णपणे वाया गेली. लोक मला त्यांची सेवा करत राहण्याची संधी देतील अशी आशा आहे, अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

मोठी बातमी : इम्तियाज जलील यांना 'एमएआयएम'कडून छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान,  5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
लालबागचा राजाच्या चरणी 5 कोटी 65 लाख रोख रुपयांचं दान, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?',  विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?', विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Truck Accident पुण्यात ट्रक खड्ड्यात व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, पुणे समाधान चौकात नेमकं काय घडलं ?TOP 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : ABP MajhaRatnagiri : स्वप्नात डेडबॉडी पाहणारा 'तो' तरूण कुठे आहे? घटनेचा ऑनलाईन गेमशी संबंध? Special ReportSpecial Report Tirupati Balaji Prasad : तिरुपतीचा प्रसाद, राजकीय वाद; प्रसादात प्राण्यांची चरबी आली कुठून?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान,  5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
लालबागचा राजाच्या चरणी 5 कोटी 65 लाख रोख रुपयांचं दान, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?',  विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?', विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
VIDEO : लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Shadashtak Yog : सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींना नोकरी-व्यवसायात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींच्या जीवनात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
Embed widget