एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil : सातारा गॅझेटिअरबाबत निर्णय न झाल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, भुजबळांवरही कडाडले!

Manoj Jarange Patil : मी मराठवाड्यातला सर्व मराठा समाज आरक्षणात घालणार आहे. थोड्याच दिवसात मराठ्यांना हे दिसणार आहे. त्यामुळे मराठ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असे देखील मनोज जरांगेंनी म्हटले.

Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील (Maratha Reservation) आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने (Maharashtra Government) मान्य करत त्यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे. या निर्णयानंतर गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी आंदोलन मागे घेत समाधान व्यक्त केले. मंगळवारी सायंकाळी, राज्यभरात विविध ठिकाणी मराठा समाजाकडून या निर्णयाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. सहा महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं.मात्र, सरकारच्या या जीआरला आता ओबीसी नेत्यांकडून तीव्र विरोध होऊ लागला आहे. विशेषतः मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या जीआरविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. तर ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने उपसमिती गठीत केली आहे. यावर भाष्य करताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिलाय. तर छगन भुजबळ यांच्यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधला. 

छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ओबीसीत मराठ्यांना मीच घालणार आहे. ओबीसी समाजाला जसं तुम्ही उपसमिती गठीत केली. तशीच दलित, मुस्लिमांसाठी उपसमिती गठीत करा. एक शेतकऱ्यांसाठी, आदिवासी आणि मायक्रो ओबीसींसाठी करा. गरीबांचा कल्याण होऊ द्या, असे त्यांनी म्हटले. 

भुजबळ म्हणजे पक्षाचं अस्तित्व संपवणारा माणूस

गेल्यावेळी ओबीसी उपसमितीच्या अध्यक्षपदी छगन भुजबळ यांची नेमणूक करण्यात आली होती. यंदा मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांचे पंख कापल्याची चर्चा रंगली आहे याबाबत विचारले असता मनोज जरांगे पाटील म्हणाले की, भुजबळ म्हणजे पक्षाचं अस्तित्व संपवणारा माणूस आहे. कार्यकर्त्यांचा अस्तित्व संपवणारा माणूस आहे. त्यामुळे बावनकुळे साहेब त्यांना चांगले वाटले असतील. कोणाला केले तरी मला काय करायचं आहे? तो माझा विषय नाही. माझा विषय आरक्षण आहे मी त्यात कुठून पडलेलो आहे, असे म्हणत त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.  

सातारा गॅझेटिअरबाबत निर्णय न झाल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, कोणी कितीही आमच्यात संभ्रम निर्माण केला. तरी माझा समाज कोणावर विश्वास ठेवत नाही आणि मी देखील कोणावर विश्वास ठेवत नाही. कारण माझ्या समाजाला माहित आहे की जे आता बोंबलत आहेत, संभ्रम निर्माण करत आहेत हे आधी कुठे झोपलेले होते? हे आधी का येत नाहीत? बैठकांना बोलवल्यावर येत नाहीत. मुंबईत बोलवल्यावर येत नाहीत, हे कशातच नसतात. हे फक्त टीव्हीवर असतात. मला हे अभ्यासक बोलवायचे देखील नव्हते. मराठा समाजाची देखील हीच इच्छा होती. पण, मुंबईतील काही बांधव बोलले की, आपण त्यांना विश्वासात घेऊन सोबत घेतले पाहिजे त्यामुळे त्यांना बोलावले. परंतु  हे संभ्रम निर्माण करतात. मराठा समाजात संभ्रम निर्माण होणार नाही. मी मराठवाड्यातला सर्व मराठा समाज आरक्षणात घालणार आहे. थोड्याच दिवसात मराठ्यांना हे दिसणार आहे. त्यामुळे मराठ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नये. पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या सातारा गॅझेटिअरबाबत देखील सरकारने हयगय करता कामा नये, जर हे झाले नाही तर तुम्हाला मी पुन्हा रस्त्यावर फिरणे बंद करेल, असा इशारा त्यांनी यावेळी राज्य सरकारला दिला.  

आणखी वाचा 

Sanjay Raut on Chhagan Bhujbal : तेव्हा तुम्ही शिवसेना सोडली, आता मंत्रिमंडळ सोडणार का? नाराजीवरून राऊतांनी भुजबळांना डिवचलं!

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
Embed widget